CM Pramod Sawant | Smart City
CM Pramod Sawant | Smart City Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: पणजीतील सिमेंटच्या रस्त्यांचे काम पावसाळ्यातही चालणार :सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant पणजी शहरात स्मार्ट सिटी योजनेच्या कामांसाठी जागोजागी रस्त्यांवर खोदकाम केले आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि मन:स्ताप ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यातच आता पाऊसही हजेरी लावत आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी रात्री पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी केली.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांतिनेज ते काकुलो मॉल या मार्गावरील कामांची माहिती घेतली. येथे रस्त्याचे काम सुरू आहे. उन्हात या रस्त्यावर धुळीचे आणि पावसात चिखलाचे साम्राज्य, असे चित्र असते. या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सिमेंटच्या रस्त्याचे काम पावसाळ्यातही सुरू राहील. पावसात हे काम सुरू राहू शकते. त्यामुळे काहीही अडचण येणार नाही. ऑक्टोबरअखेर कोणतेही काम शिल्लक राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम पावसाळ्यात केले जाईल. पावसाळ्यात एका महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. लोकांना थोडा-फार त्रास होईल. मात्र, कोणत्याही कामात खंड पडणार नाही. पावसाचा कोणताही अडथळा या कामांत येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री  म्हणाले की, भविष्यात धुळीचा त्रास होणार नाही. त्यासाठीच ही कामे पावसाळ्यात सुरू राहतील. ऑक्टोबरनंतर सिमेंट रस्त्यांचे काम केले जाईल.  पणजीमध्ये  पाणी तुंबण्याची जी समस्या उद्भवते, त्याचे कारण पावसाळ्यात काम सुरू असताना कळणार आहे.

काँक्रिट रस्त्यांच्या कामांना पावसामुळे काहीही अडचण येणार नाही. त्यातून ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी मिटवली जाईल. हे काम देखील पावसात करणे शक्य आहे, असे ते म्हणाले.

प्रामुख्याने सांतिनेज परिसरात ही कामे सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे खोदले आहेत. शिवाय गटारी, कचरा व्यवस्थापन, वीज अशा विविध खात्यांमार्फत ही कामे सुरू असल्याने या परिसरामध्ये बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

यासाठीच आज मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष या भागाला भेट देऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला. तसेच ही कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करावीत, असा आदेशही त्यांनी दिला.

पावसाळा तोंडावर आल्याने स्मार्ट सिटीच्या कामाबाबत गोंधळ उडाला असून सुरू असलेली कामे आहे त्या स्थितीत थांबवून रस्ते बनवण्यासाठीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या संपूर्ण कामाची आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT