Water Pollution Dainik Gomantak
गोवा

Water Pollution: डिचोली नदीपात्र गढूळ; नागरिकांत घबराट

दूधसागर नदीची डिचोलीत पुनरावृत्ती

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: गेल्या काही दिवसांपासून डिचोलीतील नदीतून अचानक गढूळ पाणी वाहत असून त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून हा प्रकार चालू असून, गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

(The water of the riverbed in bicholim has become unclean)

स्थानिकांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, सध्या पाऊस पडत नाही, तसेच डिचोली परिसरात या नदीत गाळ उपसण्याचे कामही चालत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणासाठी नदीचे पाणी गढूळ झाले आहे. त्याबद्दल गूढ निर्माण झाले आहे.

नदीचे पाणी गढूळ झाल्याने नदीकाठी असलेल्या विहिरीवर याचा परिणाम तर होणार नाही ना, अशी भीती नागरिकांत व्यक्त होत आहे. कारण विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. मात्र नदीचे पाणी गढूळ झाले असल्याने विहिरीचे पाणी गढूळ झाल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होईस असे म्हटले आहे. त्यामूळे याचा जलस्रोत खात्याने शोध घेऊन भीती दूर करावी, अशी मागणी आयडीसी परिसरातील विठ्ठल वेर्णेकर यांनी केली आहे.

दूधसागर नदीची डिचोलीत पुनरावृत्ती

दूधसागर नदीचे पाणी लाल झाल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत दाभाळवासीय संतप्त झाल्याचा प्रकार घडला आहे. या नदी पात्राचे पाणी लाल कसे होते, याचा शोध घेण्यासाठी जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी समिती नेमूनही काहीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरीकांनी दिला आहे. त्यामूळे दूधसागर नदीपात्राची डिचोलीत पुनरावृत्ती झाल्याचे सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT