Thivim Dainik Gomantak
गोवा

World Peace University Thivim: खासगी विद्यापीठाविरोधात थिवीवासीयांनी ठोकला ‘शड्डू’! ग्रामसभेला शेकडोंची उपस्‍थिती

World Peace University: थिवी ग्रामसभेत खासगी विद्यापीठ प्रकल्पविरोधात स्‍थानिकांनी शड्डू ठोकला. विरोधाची तीव्र भूमिका अधोरेखित करण्‍यासाठी सुमारे 300 ग्रामस्थ उपस्‍थित होते.

Manish Jadhav

पणजी: अत्यंत आक्रमकपणे प्रश्न मांडत आज (20 ऑक्टोबर) राज्यात झालेल्या बहुतांश ग्रामसभा गाजल्या. कुटबण जेटीवरील बेकायदेशीर बांधकामांवरून वेळ्ळी ग्रामसभेत गदारोळ झाला. थिवी ग्रामसभेत खासगी विद्यापीठ प्रकल्पविरोधात स्‍थानिकांनी शड्डू ठोकला. विरोधाची तीव्र भूमिका अधोरेखित करण्‍यासाठी सुमारे 300 ग्रामस्थ उपस्‍थित होते.

थिवीतील प्रस्‍तावित प्रकल्पामुळे जैवविविधतेला धोका पोहोचेल, असा दावा करून, ‘तो’ कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा ग्रामस्‍थांनी दिला. दुसरीकडे, कुटबण येथे बोट मालक संघटनेचे अध्यक्ष विनय तारी यांनी सांगितले की, सध्या ग्रामस्थ अतिसार, कॉलेरा व इतर आजाराने पछाडलेले आहेत.

आमचा कुठलाही धंदा करण्यास आक्षेप नाही. आमची एवढीच मागणी आहे, जिथे मोकळी जागा आहे ती स्वच्छ करून तिथे कायदेशीर बांधकाम करावे व स्थानिकांना व्यापार करण्याची संधी द्यावी. सध्या या परिसरात सर्व काही बेकायदेशीर कामे सुरू आहेत. ती बंद व्हायला हवीत. सरपंच लुडोविना फर्नांडिस यांनी सांगितले की, कुटबण जेटीवर ज्यांना धंदा करण्याचा परवाना दिला आहे, त्यांच्याकडे अधिकृत घर क्रमांक आहे. ह्या मुद्यावर बरीच गरमागरम चर्चा झाली.

खनिज वाहतुकीचा मुद्दा पिळगावात तापला

खनिज वाहतूक, कचरा प्रश्‍‍नावरून पिळगावची ग्रामसभा तापली. ग्रामसभेला शंभरहून अधिक ग्रामस्थांची उपस्थिती होती. खनिज वाहतुकीमुळे स्‍थानिकांना होणारा त्रास विचारात घेऊन भविष्‍यकालीन दृष्टिकोनातून विरोध करत असल्‍याचे यावेळी स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT