Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यवसाय थंडावतोय !

Goa Taxi: टॅक्सी संघटनांचा दावा: टॅक्सी ॲप्सचा फटका बसत असल्याचे मत

दैनिक गोमन्तक

Goa Taxi: गोव्यातील ​पारंपरिक टॅक्सी व्यवसाय गेल्या काही वर्षांपासून मंदावत आहे. टॅक्सी ॲप्स सुरू झाल्यामुळे गोव्याच्या पारंपरिक व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. राज्य सरकार टॅक्सी एग्रीगेटर्सना सहाय्य करत असल्याचा दावा गोव्यातील टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांनी केला आहे.

गोव्यात अनेक दशकांपासून टुरिस्ट टॅक्सी आणि पिवळ्या काळ्या टॅक्सी सुरू आहेत. पारंपरिक टॅक्सी सेवा व्यवसाय सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी खूप चांगला चालत होता.परंतु कोविड महामारीनंतर, जग डिजिटल झाले आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणारे बनले आहे. टॅक्सी ॲप्स आणि टॅक्सी ॲग्रीगेटर्सनी गोव्याच्या पारंपरिक टॅक्सी सेवा व्यवसायात प्रवेश केला आहे आणि यामुळे पारंपरिक टॅक्सी चालकांना त्यांच्या स्वत: च्या मार्गाने व्यवसाय करणे कठीण होत आहे.

येत्या काही वर्षांत पारंपारिक टॅक्सी व्यवसाय करणे शक्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ‘गोमन्तक’ने काही टॅक्सी संघटनांशी संपर्क साधला तेव्हा, बहुतांश टॅक्सी संघटनांनी गोव्याच्या पारंपरिक टॅक्सी व्यवसायात टॅक्सी ॲप्स आणि ॲग्रीगेटर आणल्याबद्दल राज्य सरकारला दोष दिला. पारंपरिक टॅक्सी व्यवसायात राज्य सरकारच्या अनावश्‍यक हस्तक्षेपामुळे बिघडत चालला आहे, असा दावा टॅक्सी संघटनांनी केला आहे.

पारंपरिक टॅक्सीचालकांचे हाल थांबवा !

कलंगुट येथील टॅक्सी मालक लक्ष्मण (बाप्पा) कोरगावकर म्हणाले की, सरकारने आणलेल्या टॅक्सी ॲप्समुळे पारंपरिक टॅक्सी चालकांना पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणे कठीण झाले आहे. आता बिगर गोमंतकीय लोक ॲपच्या माध्यमातून टॅक्सी व्यवसायात उतरत आहेत आणि गोव्यातील पारंपरिक टॅक्सी चालकांचे हाल होत आहेत.

आजकाल सरकारी नोकर त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर टॅक्सी विकत घेत आहेत आणि नंतर टॅक्सी व्यवसायासाठी लावत आहेत. याचा वाईट परिणाम पारंपरिक टॅक्सी व्यवसायिकांवर होतो. अशा प्रकरणांची सरकारकडून चौकशी व्हायला हवी, असे कोरगावकर म्हणाले

गोव्यातील पारंपरिक टॅक्सी व्यवसाय राज्य सरकारने संपवला आहे. सरकारने पारंपारिक टॅक्सी व्यवसायाला चालना द्यायला हवी होती पण त्याऐवजी सरकारने टॅक्सी ॲप्स आणि टॅक्सी ॲग्रीगेटर्सला समर्थन देण्यास सुरुवात केली.
-चेतन कामत,पर्यटक टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष
राज्य सरकार आपला पारंपरिक टॅक्सी व्यवसाय संपवण्याचा प्रयत्न करत आहे. जो गेली अनेक वर्षे उत्तम प्रकारे चालत होता. सरकारने गोवा टॅक्सी ॲप, गोवा माइल्स ॲप, मुख्यमंत्री गोयंचो पात्रांव टॅक्सी योजना आणली. ज्यामुळे आपल्या पारंपारिक टॅक्सी व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे.
. -सुनील नाईक, येलो-ब्लॅक टॅक्सी असोसिएशन करमळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT