Pratapsinh Rane: तब्बल 17 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या प्रतापसिंह राणे यांनी कोणताही गाजावाजा न करता गोव्याला विकासात्मकदृष्ट्या उंचीवर नेले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज सामान्यांचे जीवनमान उंचावले आहे.
निसर्गाशी सांगड घालणारी प्रगतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. बांदोडकर, पर्रीकरांप्रमाणे त्यांचे नावही कालातीत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे त्यांच्या 85 व्या वाढदिनानिमित्त अभीष्टचिंतन केले.
कन्या विश्वधारा, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डाॅ. दिव्या राणे आदींची उपस्थिती होती. यावेळी केक कापून आणि आत्मचरित्राचे लोकार्पण करून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा 85 वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, की खरे तर आजच्या युवावर्गांबरोबर राजकारणातील अनेकांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. त्यांच्यामुळेच राज्याचे अस्तित्व आहे आणि राहणार आहे. त्यांच्यामुळेच राज्याला घटकराज्य मिळाले आणि तेच गोव्याचे खरे शिल्पकार आहेत.
राज्यातील विविध स्तरांतील मान्यवरांसह महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यांतून मोठ्या संख्येने हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त हजेरी लावली होती. एकूण ५० हजारांच्या आसपास नागरिकांची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली होती व या मंडपात विठ्ठलापूर - साखळी येथील राणे यांच्या राजवाड्याचे स्वरूप या भव्य मंडपाला देण्यात आले होते. यावेळी हर्षदीप कौर व ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांच्या गाण्याचा व नृत्याचा बहारदार कार्यक्रम झाला.
आत्मचरित्रातून कळेल इतिहास ः प्रभू
सुरेश प्रभू म्हणाले, गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे कार्य अलौकिक आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून गोव्याच्या राजकारणाचा इतिहास येणाऱ्या पिढीला कळणार आहे. ते महान व्यक्ती असून राजकारणाबरोबर सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सत्तरी आणि गोव्याच्या विकासाबरोबर देशभर त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आज त्यांचे पुत्र व सून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्कृष्ट देशसेवा करत आहेत. त्यांचा वारसा ते पुढे नेत आहेत.
पर्ये - सत्तरी येथील श्री भूमिका मैदानावर माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार व भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, राणे यांच्या पत्नी विजयादेवी राणे,
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.