Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism : गोव्यातील पर्यटनासाठी बुकिंग घेणाऱ्या तीन वेबसाइटना नोटीस; पर्यटन खाते अ‍ॅक्शन मोडमध्ये

गोव्यातील पर्यटनासाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या

दैनिक गोमंतक

गोवा पर्यटन खात्याने पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यामध्ये नोंदणी न करता पर्यटन व्यवसायात प्रवेश केलेल्या व्यावसाईकांना नोंदणी करण्याच्या सुचना केल्या आहेत. तसेच सर्वांसाठी नोंदणी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी एक नियमावली देखील बनवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज विनानोंदणी तीन वेबसाइटना नोटीस बजावण्यात आली आहे.

( The tourism dept issues notices to Make My Trip Lohono com Goanvillasforrent com )

मिळालेल्या माहितीनुसार पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी पर्यटन खाते अ‍ॅक्शनमोडमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन खात्याकडे नोंदणी केली नसलेल्या हॉटेल्स व इतर पर्यटन व्यवहारांची ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्या तीन वेबसाइटना नोटीस बजावली आहे. यामध्ये मेक माय ट्रीप, लोहोनो, गोवा व्हिलाज फॉर रेन्ट यांचा समावेश आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाई करताना पर्यटन खात्याने म्हटले आहे की, कारवाई केलेल्या तीन वेबसाइट प्रशासनाने परवाना नूतनीकरण केलेले नाही. शिवाय ते ऑनलाइन व्यवहार आणि हॉटेलच्या खोल्यांची विक्री करत असल्याचे आढळून आल्याने पर्यटन व्यापार कायदा नोंदणीच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

पर्यटकांसाठी देखील नियमावली

पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकारने पर्यटन स्थळांसाठी कठोर नियम आणले आहेत, गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला मोठा दंड मोजावा लागू शकतो, यामध्ये रु. 50,000. पर्यंत दंड म्हणून भरावे लागू शकतात. गोवा सरकारने सर्व पोलिस ठाण्यांना नवीन नियम लक्षात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

VIDEO: जस्सी 'जैसा' कोई नही! क्विंटन डिकॉकला केलं चारीमुंड्या चित, धाकड गोलंदाजीनं केलं क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

सत्तरीत अवकाळी पावसाचा तडाखा! अचानक कोसळलेल्या सरींनी काजू उत्पादकांचे धाबे दणाणले; उत्पादन घटण्याची भीती

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

SCROLL FOR NEXT