मोरजी येथे टॅक्सी व्यावसायिकांना मार्गदर्शन केल्यानंतर बोलताना सुदीप ताम्हणकर व इतर
मोरजी येथे टॅक्सी व्यावसायिकांना मार्गदर्शन केल्यानंतर बोलताना सुदीप ताम्हणकर व इतर Nivrutti Shirodkar
गोवा

Goa: पर्यटन टॅक्सीला कोणत्याही परिस्थितीत मीटर बसवले जाणार नाही

Nivrutti Shirodkar

मोरजी - पर्यटन टॅक्सीला (Tourist taxi) कोणत्याही परिस्थितीत मीटर बसवून घेतले जाणार नाही, उलट सरकारने कोरोना काळात (Covid-19) जे आमच्यावर संकट आणले ते दूर करून आर्थिक मदत करावी, शिवाय माईल्स अप्प रद्द करावा अश्या आशयाचे ठराव मोरजी, मांद्रे , हरमल केरी किनारी भागातील टॅक्सी व्यावासीकानी मोरजी (Morjim) येथे आरटीआय नेते सुदीप ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.(The taxi meter will not be installed)

सुदीप ताम्हणकर यांनी माहिती देताना मीटर नको ,कोरोना काळात 18 महिने व्यवसाय पर्यटक नसल्याने ठप्प झाला आहे . पोटा पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे उपासमारीची पाळी आली. बँक चे हप्ते अडलेले आहेत त्यामुळे अनेकाना बँक कडून नोटीसा आलेल्या आहेत .राज्य सरकारने या व्यावसायिकांकडे कधी सहानभूतीपूर्वक पाहिले नाही . असा दावा करून मागचे 18 महिने स्थानिकांचा व्यवसाय संकटात आला असताना आज पर्यंत सरकारने एकदाही त्त्यांची बैठक घेतली नाही . आज पर्यंत टेक्सी व्यावसाईक ,बस वाहतूक या व्यवसाईकांची बैठक घेवून हा प्रश्न सोडवायला हवा होता , परंतु तो सोडवला गेला नाही.

भारतीय जनतेचे सरकार नव्हे

हे निर्लज्ज सरकार आहे,18 महिने व्यवसाय ठप्प आहे तर व्यावासिक अन्न कसे खातात असा निर्लजपणे सरकार प्रश्न विचारात आहेत, त्यामुळे हे सरकार भारतीय जनतेचे नसून ते ब्रिटीशांचे आहे असा आरोप सुदीप ताम्हणकर यांनी केला . हुकूमशाहीचे सरकार आहे

उपाशी पोटी वेक्सीन

स्थानिक व्यावसाईकांचे सरकारला काहीच पडलेले नाही . सरकार टेक्सी व्यवसाईक उपाशी असतानाच सरकार जनतेला उपाशीपोटी वेक्सीन घ्यायला लावतात ते केवळ मोदीला खुश करण्यासाठी असा दावा ताम्हणकर यांनी केला . डॉक्टर एखाद्यावेळी ताप आला किंवा आजारी असेल तर गोळी देतो ती डॉक्टर सांगतात भरलेल्या पोटी घ्या , आणि हे सरकार वेव्क्सीन उपाशी पोटी देते . वेक्सीन मार्फत कमिशन खावून डॉक्टर प्रमोद सावंत हे शिशुपाल असल्याचा दावा केला .

नोटीसला भिक घालणार नाही

साडे एकरा हजार रुपये खर्च करून मीटर बसवावा यासाठी सरकार पब्लिक नोटीसे पाठवत आहे, अश्या नोटीसाना आम्ही भिक घालणार नाही असा इशारा व्यवसाईकनि दिला.

आमदाराची इच्छा शक्ती नाही

स्थानिक आमदार दयानंद सोपटे हे कॉंग्रेस पक्षात असताना विधानसभेत आणि बाहेरही या टेक्सी व्यावसाईकांचे प्रश्न मांडत होता ते आता सत्येत आहे गोवा पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत गोवा माईल्स विषय येतो आणि या मंडळाचे चेरमेन सोपटे आहेत आणि ते यावर भाष्य करत नसल्याबद्दल सुदीप ताम्हणकर यांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारला हद्दपार करणार ?

छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्यासाठी मावळ्याना संघटीत करून कार्य केले . त्याच शिवाजी राज्यांचे आम्ही मावळे आहोत , छत्रपती राजेंची तलवार हातात घेवून टेक्सी , व वाहतूक व्यवसाईक भाजपा सरकारला इशारा देताना आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हे सरकारच हद्दपार करण्याची आम्ही निर्धार केल्याचे सांगितले . गोवा माईल्स व मीटरचे भूत मानगुटीवर बसवले ते सरकारने दूर करावे अन्यथा आम्ही सरकारच्या विरुद्ध लढायला तयार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT