Goa: सत्तरीत महापुराचा बागायतींना फटका

तार, सोनाळ, कडतरी, हेदोडे, कुडशे गावांना दरवर्षीच पुराचा तडाखा (Goa)
Goa: Flood water enter in horticulture field.
Goa: Flood water enter in horticulture field.Padmakar Kelkar-Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : सत्तरी तालुक्यात मागील पाच सहा दिवस पावसाने (Rain) सर्वत्र कहरच केला होता. त्यामुळे शेती बागायतींचे (Horticulture field) मोठे नुकसान झाले आहे. त्याचा बऱ्याच बागायतदारांना फटका बसलेला आहे. अधिक करून सोनाळ, तार, कडतरी, कुडशे, हेदोडे आदी गावांना फटका बसलेला आहे. तार, सोनाळ गावाजवळच असलेल्या म्हादई नदीचे (Mhadei River) पाणी मुख्य रस्त्यावर नदीचे पाणी तुडुंब भरून (Overflow of river water) राहिले होते. त्यामुळे कडतरी, सोनाळ, तार गाव पूर्णपणे संपर्काबाहेर गेला. अनेकांच्या घरांत नदीचे पाणी घुसले, वाहतूक ठप्प झाली होती. लोकांनी असा अनुभव १९८२-८३ नंतर २०१९-२० साली व आता यावर्षीही पाहिला आहे.
(Goa)

Goa: Flood water enter in horticulture field.
Goa: डिचोलीत पुरामुळे 3 कोटींहून अधिक हानी

म्हादई नदी यंदा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत होती. तिचे रौद्ररुप पाहून सर्वांचा थरकाप उडाला होता. एकूणच मुसळधार पाऊस, वादळी वारे यामुळे बागायतीमधील केळी पिकाची नासाडी झाली. वादळी वाऱ्यामुळे सुपारी पीक गळून पडले, झाडे कोसळली. हेदोडे गावजवळील नदीला मोठे पाणी येऊन रस्त्यावर पाणी तुंबले. पुराचे पाणी बागायतीत मोठ्या क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे बागायती चिखलमय, पाणीमय बनल्या आहेत. बागायतीत सुपारी, नारळ, केळी पिकाच्या लागवडीत पाणीच पाणी झाले आहे. १९८२-८३ नंतर म्हादई नदीला पूर आल्यानंतर या घटनेची पुरावृत्ती दोन वर्षांपूर्वी ४ ऑगस्ट २०१९ रोजी घडली होती. यावर्षीही २१, २२ जुलै रोजी या पुराने सगळेच भुईसपाट करून टाकले. पाणी सोनाळ वाळपई रस्त्यावर व तार सावर्डे येथे साचून रहदारी बंद झाली. हे दरवर्षी घडत असते, पण यावर्षी कहरच झाला. याची दखल आजपर्यंत सरकारी यंत्रणेतर्फे घेण्यात आली नाही. गेली पस्तीस वर्षे रस्ता उंच करण्याच्या मागणीकडे सरकारी यंत्रणेकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे सोनाळवासीयांना पुराचा थरार अनुभवा लागत आहे.

Goa: Flood water enter in horticulture field.
Goa: पुराच्या तडाख्यामुळे गुळेलीतील पूल गेला वाहून

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com