येत्या 25 नोव्हेंबरपासून 7 वी व 8 वीचे वर्ग (School) सुरु होणार  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 25 तारखेपासून शाळेची घंटा वाजणार

7 वी व 8 वीचे वर्ग 25 पासून होणार सुरु, सरकारने यापूर्वीच 9वी ते 12वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे काही शाळांनी (School) हे वर्ग सुरू केले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील आठवी इयत्तेपर्यंतच्या शाळा (School) सुरू करण्याबाबत सावधगिरी बाळगताना सरकारने तूर्त 7 वी व 8 वीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू (Offline) करण्यास मंजुरी दिली आहे. हे वर्ग येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यासंदर्भातचे परिपत्रक काढून सर्व शाळांना उद्यापर्यंत पाठविले जाईल. सहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती शिक्षण संचालक भूषण सावईकर (Bhushan Sawaikar) यांनी दिली.

सरकारने यापूर्वीच 9वी ते 12वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे काही शाळांनी हे वर्ग सुरू केले आहेत. मात्र, काही शाळांनी सोयीसुविधांच्या उणीवेमुळे सुरू केलेले नाहीत. कोविड - 19 संदर्भातच्या तज्ज्ञ समितीने ८ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कृती दल समिती अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत समितीच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग आज 22 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास हरकत नाही अशी शिफारस केली होती.

दरम्यान, समितीने केलेल्या शिफारशीबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सहमती न दाखवता शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय विविध क्षेत्रातील घटकांशी चर्चा तसेच सूचना मागवून घेणार असल्याने 22 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार नाहीत. त्यासंदर्भातचा निर्णय 20 नोव्हेंबरला घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. गेल्या शनिवारी 20 नोव्हेंबरला इफ्फी उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री व्यस्त राहिल्याने त्यासंदर्भातचा निर्णय सरकारला घेणे शक्य झाले नाही.

राज्यात ज्या ठिकाणी शिक्षण संकुले आहेत त्या ठिकाणी सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर एकत्रित गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोणत्या इयत्तेपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष वर्गाने घेणे शक्य आहे तसेच त्यासाठी आवश्‍यक असलेल्या सोयीसुविधांचा विचार करून तो निर्णय घेण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनांवर देण्यात यावी अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती. त्यामुळे सरकारने त्या सूचनांचा विचार करून सध्या 7 वी व 8 वीचे वर्ग सुरू करून टप्प्याटप्प्याने इतर वर्गही शाळा व्यवस्थापनांनी त्यांच्याकडे असलेल्या वर्गांच्या क्षमतेनुसार सुरू करण्याचे निर्देश पुढील काही दिवसांत शिक्षण खात्याकडून जाण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT