Sanquelim News Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News: साखळीला ‘रोल मॉडेल’ बनविणार- नगराध्यक्ष रश्मी देसाई

नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर. उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांचीही निवड जाहीर.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim News साखळी विकासाच्या दृष्टीने साखळी शहर राज्यात ‘रोल मॉडेल’ बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून साधनसुविधा विकासाबरोबरच मानवी विकासावरही लक्ष देणार आहे, असे मत साखळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी व्यक्त केले.

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रश्मी देसाई या पत्रकारांशी बोलत होत्या. नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर रश्मी देसाई यांनी आपल्या कार्यालयाचा ताबा घेतला.

नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी रश्मी देसाई तर उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नगरपालिकेच्या कॉन्फरन्स सभागृहात सर्वप्रथम सर्व नगरसेवकांना शपथ देण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी नगराध्यक्षपदी रश्मी देसाई तर उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांची निवड जाहीर केली. विरोधात एकही अर्ज आला नव्हता. पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर उपस्थित होते.

नगरपालिका सभागृहातील पदग्रहण सोहळ्यास नगरसेवक यशवंत माडकर, निकिता नाईक, सिद्धी प्रभू पोरोब, रश्मी देसाई, प्रवीण ब्लेगन, विनंती पार्सेकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, दीपा जल्मी व अंजना कामत यांची उपस्थिती होती.

विश्वास सार्थ ठरविणार!
उपनगराध्यक्षपदी निवड झालेल्या आनंद काणेकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पक्षाने आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे.

साखळी बाजारात एक उत्तम व्यवस्था निर्माण करून बाजाराला वैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. 6 नगरसेवकांची मराठीतून, 3 जणांची कोकणीतून तर 3 जणांची इंग्रजीतून शपथ घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT