Bicholim News: डिचोलीत 'या' दिवशी होणार राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

रोटरी क्लबतर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गटातून बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak

Bicholim News डिचोली येथील रोटरी क्लबतर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गटातून बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘बटल ऑफ माईंड्स’ या संकल्पनेखाली 20 आणि 21 मे असे दोन दिवस झांट्ये महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात स्पर्धा होईल.

डिचोली तालुका बुद्धीबळ संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कारापूरकर आणि डिचोली तालुका बुद्धीबळ संघटनेचे सचिव सत्यवान हरमलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

Bicholim News
Power Shutdown : राज्यात 'या' दिवशी वीजपुरवठा होणार खंडित

यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. स्पर्धेत वेगवेगळ्या गटांतून दोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. पत्रकार परिषदेस रोटरी क्लबचे भावी अध्यक्ष सरगम फळारी, सचिव विराज शिरोडकर आणि खजिनदार दामोदर प्रभू उपस्थित होते.

आकर्षक बक्षिसे
या स्पर्धेसाठी 40 हजार रुपयांची रोख बक्षिसे, 55 चषक आणि 15 पदके पुरस्कृत करण्यात आली आहेत.

प्रथम 12 हजार, द्वितीय 8 हजार, तृतीय स्थानासाठी 5 हजार अशी विविध बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत, अशी माहिती विराज शिरोडकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com