Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: वेळसाववासीयांनी रेल्वेचे काम रोखले, उपजिल्हाधिकारी उद्या घटनास्थळीची पाहणी करणार

मुरगाव उपजिल्हाधिकारी 13 जानेवारी रोजी घटनास्थळी पाहणी करून संबंधितांशी चर्चा करणार

गोमन्तक डिजिटल टीम

रेल्वे विकास निगम वेळसांव वासीयांच्या खासगी जागेत अतिक्रमण करुन बांधकाम करीत असल्याचा दावा करून वेळसाववासीयांनी  रेल्वे विकास निगमच्या कामगारांना काम करण्यापासून रोखले आहे. तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.

दरम्यान मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी या वादाची दखल घेत उद्या म्हणजेच  13 जानेवारी  रोजी सकाळी घटनास्थळी  देऊन पाहणी करण्याचे ठरविले आहे. याप्रसंगी ते संबंधित रहिवाशी आणि  रेल्वे विकास निगमच्या अधिकारीवर्गासमवेत चर्चा करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

वेळसांव येथे रेल्वे विकास निगम व रहिवाशी यांच्यामध्ये वाद होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. “रेल्वे विकास निगमचा कंत्राटदार कोणत्याही वर्कऑर्डर आणि  कागदपत्रांशिवाय काम करत असून त्याशिवाय संबंधित जमिनीमध्ये ते अतिक्रमण करीत असल्याचा दावा तेथील रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी तेथील रहिवाशांनी वेळसांव पंचायतीकडे तक्रार केल्यावर सरपंचानी रेल्वेला काम बंद करण्यासंबंधी नोटीस दिलीय.

तथापी रेल्वेच्या कंत्राटदाराने काम सुरुच ठेवले आहे. कंत्राटदाराचे कामगार खासगी जागेत येऊन काम करु लागल्याने रहिवाशांनी संताप केला. पोलिसांनी बार्रेटो यांचे काम बंद पाडल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने वास्कोचे उपअधीक्षक सलिम शेख, वास्कोचे निरीक्षक कपिल नायक, वैर्णाचे निरीक्षक डायगो ग्रासियस घटनास्थळी दाखल झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT