Goa Government: आता जन्म, मृत्यू प्रमाणपत्र मिळणार ऑनलाईन, केवळ 'इतक्या' रूपयांत मिळेल सर्टिफिकेट...

मुख्यमंत्री सावंत यांनी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाचे वेब पोर्टल सुरू केले
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. याच धर्तीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यातील जनतेच्या सोयीसाठी नवी संकल्पना अंमलात आणत आहेत.

मुख्यमंत्री सावंत यांनी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाचे वेब पोर्टल सुरू केले असून लोक आता ऑनलाइन मोडमध्ये जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र शोधू शकतात आणि डाउनलोड करू शकतात. ऑनलाइन मोडमध्ये 25 रुपये पेमेंट भरून ही सर्टिफिकेट उपलब्ध होणार आहेत. पोर्टलवर आत्तापर्यंत 18 लाख जन्म आणि मृत्यूचे तपशील अपलोड केले असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.

Goa Government
Land Grabbing Case : जमीन हडपप्रकरणी 'मास्टरमाइंड'ला सलग पाचव्यांदा जामीन

या अभियानामार्फत मोदी सरकारचा देशाला माहिती तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा प्रयास आहे. नागरिकांना सरकारी सुविधांचा आणि योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून मुख्यमंत्री सावंत यांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे लोकांचे काम जलद आणि सोपे होणार असून, "नगरपालिका, GMC आणि इतर कार्यालयांवरचा दबाव कमी होणार आहे", असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com