babush monserrate | Goa News Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate : पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरण; जमाव आक्रमक झाल्याची पोलिसांची न्यायालयासमोर माहिती

१९ फेब्रुवारी २००८ रोजी पणजी पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्यात आला होता

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी पोलिस स्थानकावरील हल्ला प्रकरणाच्या सुनावणीला पोलीस निरिक्षक तुषार लोटलीकर वैद्यकीय कारणास्तव हजर न राहिल्याने सुनावणी 22 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक लोटलीकर यांची उलटपासणी घेण्यात आली.

पणजी पोलिस स्थानकावर नेण्यात आलेला मोर्चा रात्री ९.३० वाजता शांत असला तरी गुन्हेगारांना अटक करण्यात होणाऱ्या विलंबाबात अधुमधून पोलिसांविरोधात या जमावाकडून घोषणा दिल्या जात होता. त्यानंतर अचानक मोर्चाच्या मागील बाजूने बाटल्या व दगडफेक झाली. तेव्हा तत्कालिन आमदार बाबुश मोन्सेरात यांच्यासह त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात व महापौर टोनी रॉड्रिग्ज हे जमावाच्या पुढील रांगेत होते अशी जबानी पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी उलटपासणीवेळी दिली. ही सुनावणी येत्या २७ डिसेंबरला पुढे सुरू राहणार आहे.

पोलिस स्थानकावरील हल्ल्याच्या खटल्यावरील उलटतपासणीवेळी न्यायालयात आज बाबुश मोन्सेरात यांच्यासह काहींनी अर्ज सादर करून अनुपस्थितीबाबत मुभा घेतली होती. बाबुश मोन्सेरात यांचे वकील अरुण ब्रास डिसा यांनी आज या प्रकरणातील प्रथम तपास अधिकारी तुषार लोटलीकर यांची उलटतपासणी सुरू केली. ब्रायन गुदिन्हो याला झालेल्या मारहाणप्रकरणी गुन्हेगारांच्या अटकेसाठी हा मोर्चा पोलिस स्थानकावर ताळगाव येथून नेण्यात आला होता त्यावेळी मोन्सेरात हे मोर्चाचे नेतृत्व करत होते. १९ फेब्रुवारी २००८ रोजी पोलिस स्थानकावर संध्याकाळी ५.३० मोर्चा आला व रात्री ९.३० पर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता.

मोर्चेकारी येताना बाटल्या किंवा दगड घेऊन आले नव्हते. मोर्चेकारांची मागणी पूर्ण होत नाही तेव्हा मोर्चेकारी व पोलिसांचे उभारलेल्या कड्यामध्ये ढकलाढकली सुरू झाली. त्याचवेळी मोर्चाच्या मागील बाजूने दगडफेक व बाटल्या फेकण्यात आल्या. हे फेकणारे कोण होते याबाबत माहीत नाही. मोर्चा आला तेव्हा पोलिस निरीक्षक पोलिस स्थानकात नव्हते ते बंदोबस्त ड्युटीसाठी गेले होते.

पणजी पोलिस स्थानकावर मोर्चा चालून येत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताचे काही पोलिस पोलिस स्थानकाकडे वळविले होते. तसेच सुरक्षिततेसाठी पोलिसांनी प्लास्टिक शिल्ड्स तसेच लाठ्या घेऊन येण्याचा आदेश त्यांनी दिला होता हे खरे आहे. पोलिस स्थानकाच्या आवारात बाटल्या किंवा दगड आणण्यात आलेले नव्हते. प्राथमिक चौकशीनंतर हे प्रकरण त्यानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. ८ महिन्यानंतर सीबीआयने हे प्रकरण हाती घेतल्यानंतर घटनास्थळी झालेल्या प्रकरणाची नव्याने नोंदणी केली. पोलिसांकडून मोर्चेकारांना झालेल्या मारहाणप्रकरणीची तक्रार देण्यात आली होती व दखलपात्र असूनही त्याची नोंद करून घेण्यात आली नव्हती हे सत्य आहे, असे उलटतपासणीत लोटलीकर यांनी न्यायालयासमोर सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT