Parking Plaza Dainik Gomantak
गोवा

Margao News: पार्किंग प्लाझाला राजकीय ग्रहण

आराखडा नाही : कोलवा येथील कामत- सरदेसाईंमधील वादाची झळ

गोमन्तक डिजिटल टीम

Parking Plaza कोलवा सर्कलजवळील बहुप्रतिक्षित पार्किंग प्लाझा प्रकल्पाला राजकीय ग्रहण लागले आहे. येथील तुल्यबळ दोन आमदारांच्या वादात या चांगल्या प्रकल्पाला खीळ बसली आहे.

एक वेळ मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या नगरसेवकांचे संयुक्त पॅनेल मडगाव पालिकेवर सत्ता गाजवत होते.

अडीच वर्षांनंतर जेव्हा कामत गटाचा नगराध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तसेच कामत कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. मग भाजपचे पूर्ण बहुमत असलेले नगरसेवक नगरपालिकेवर सत्ता गाजवू लागले.

तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमधील वादाची दरी वाढतच चालली आहे. फातोर्डातील विकासकामे मडगावचे आमदार कामत अडवित आहेत, असा आरोप विजय सरदेसाई वारंवार करीत आहेत.

त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे नियोजित पार्किंग प्लाझा. सध्या या पार्किंग प्लाझाच्या जागेवर नगरपालिका फेस्ताची फेरी भरवते.

त्यामुळे उत्पन्नाचे मजबूत स्रोत सोडून हा प्रकल्प उभारणे, म्हणजे सोपोच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सोपो शुल्कामुळे ‘प्रकल्प रद्द’ची टांगती तलवार

पार्किंग प्लाझासाठी संपादन केलेल्या जागेवर फेस्त फेरी भरविण्यात येत आहे. त्यातून सोपो शुल्काद्वारे नगरपालिकेला लाखो रुपये महसूल प्राप्त होत आहे, असे नगराध्यक्षा शिरोडकर यांचे म्हणणे आहे.

ओल्ड मार्केटमधील ही जागा केवळ पार्किंगसाठीच नगरपालिकेने संपादित केली होती. असे असूनसुद्धा फेस्त फेरीपासून सोपो शुल्काद्वारे मिळणारा महसूल बंद होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कदाचित पार्किंग प्लाझाची योजना रद्दसुद्धा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जमिनीचे सीमांकन आवश्‍यक : प्रथम या पार्किंग प्लाझाच्या कामाचा शुभारंभ सोहळा अडविण्यात आला. ‘जीसुडा’तर्फे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, तेव्हाही ते बंद पाडण्यात आले. हे बंद पडलेले काम केव्हा सुरू होईल याची वाट नागरिक पाहात आहेत.

नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘जीसुडा’ने नियोजित पार्किंग प्लाझाचा आराखडा अद्याप सादर केलेला नाही.

पार्किंग प्लाझासाठी जी जमीन संपादन केली आहे, तिचे सीमांकन आवश्यक आहे, असे नगराध्यक्ष म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT