Goa Drugs Case: पणजीनजीक शाळेच्‍या परिसरातच ड्रग्‍सचा व्‍यवसाय?

ताळगाव ग्रामसभा तापली : पुढच्‍या वेळी ‘पीआय’ला बोलवा
Drug Case
Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Case ताळगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील मुख्य चौकात असलेल्या प्राथमिक शाळेच्या परिसरात अमलीपदार्थ विक्रीचा व्यवसाय चालतो. तेथे लहान मुले शाळेत येजा करीत असतात. त्यामुळे या प्रकाराला त्‍वरित आळा घालावा, अशी मागणी आल्बेर्टिना आणि ग्रामस्‍थांनी ताळगाव ग्रामसभेत केली.

तसेच पुढील सभेला पोलिस निरीक्षकांना बोलावून पंचायत क्षेत्रातील अवैध बाबी त्‍यांच्‍या निदर्शनास आणून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी लावून धरली. विशेष म्‍हणजे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांचे घर या शाळेपासून हाकेच्‍या अंतरावर आहे.

सरपंच जानू रुझारियो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत पंचायत क्षेत्रातील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिवाय महत्त्वाच्या ठरावावरही चर्चा करून ते संबंधित यंत्रणेला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

चर्चेवेळी ग्रामस्‍थ आल्बेर्टिना यांनी सांगितले की, पंचायत क्षेत्रात विकास व्हावाच, परंतु विकासाबरोबर येथील गैरव्यवहार बंद होणे आवश्‍यक आहे.

त्याचबरोबर प्राथमिक शाळेपासून काही अंतरावर ड्रग्‍सची विक्री चालते. हा प्रकार धक्कादायक असून त्‍यास त्‍वरित आळा घालावा, अशी मागणी करण्‍यात आली.

Drug Case
Ponda Municipal Elections 2023: शह-काटशहाच्या राजकारणाला ऊत; 3 प्रभागांमध्ये ‘कांटे की टक्कर’

शेतजमिनीतून कोणताही रस्ता केला जाऊ नये असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. आयडियल हायस्कूलपासून काही अंतरावर रस्त्याच्या अगदी बाजूला अतिक्रमण झाले आहे. पंचायतीने त्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ या संघटनेने दिलेला व्याघ्र प्रकल्पाचा ठराव घेण्याचा प्रस्ताव मंजूर करताना तो संबंधित यंत्रणेला पाठवून देण्याची सूचनाही उपस्थितांनी केली.

Drug Case
Sanquelim Municipal Elections 2023: साखळीत सर्वच उमेदवारांनी साधला ‘सुपर संडे’

दोनापावला परिसरात रात्रीचे पाणी

दोनापावला परिसरात पाणी सोडण्याची वेळ पाळली जात नाही. रात्रीचे पाणी सोडले जात असल्याने लोकांना पाण्यासाठी ‘वॉचमन’ म्हणून काम करावे लागते, असा उपरोधिक टोला लगावून ग्रामस्‍थांनी ही समस्‍या सोडविण्‍याची मागणी केली.

अत्यंत कमी दाबाने पाणी येते व तेसुद्धा केवळ पाऊण तास. त्यामुळे मोठ्या उत्सवांना पंचायत क्षेत्रात परवानगी दिली जाऊ नये, कारण अशा उत्सवांना भरपूर पाणी लागते, असेही ग्रामस्‍थांनी सांगितले.

ॲड. पुंडलिक रायकर म्हणाले, पंचायत क्षेत्रातील पाण्‍याचा प्रश्‍न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत या क्षेत्रात टँकरमाफियांचे राज्य चालणार हे निश्‍चित.

त्यामुळे कोणत्याही बांधकामांना परवानगी दिली जाऊ नये. पाणीपुरवठा सेवा हे एक मोठे रहस्य बनल्याचा आरोप त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com