Canacona News Dainik Gomantak
गोवा

Canacona News: चक्क सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयालाच ठोकले टाळे, कर्मचाऱ्यांनाही कोंडले

काणकोणातील प्रकार : अपघात वाढूनही साबांखा उदासीन

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News मडगाव-कारवार हमरस्त्यावरील करमलघाटात वारंवार अपघात होत असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याचा हमरस्ता विभाग अकार्यक्षम ठरला आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून काल मंगळवारी गुळे येथे झालेल्‍या अपघातात चापोली येथील एका दाम्‍पत्याचा हकनाक बळी गेला.

त्‍याच्या निषेधार्थ आज बुधवारी साबांखा हमरस्ता विभागाच्या काणकोणातील कार्यालयाला काँग्रेसचे जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन टाळे ठोकले आणि सरकारी अधिकाऱ्यांना कक्षात कोंबले.

हमरस्ता विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांना अनेकवेळा रस्त्याच्या दुरुस्‍तीबाबत निवेदने देण्यात आली. करमलघाटात धोकादायक वळणाच्या खाली असलेल्या 22 सागवानी वृक्षांची एका रात्रीत कत्तल करण्यात आली.

येथील बॅरिकेड्‌स तोडून दोन अवजड वाहने खोल दरीत कोसळली. मात्र या धोकादायक वळणावर धोक्याचा इशारा देणारा साधा फलकही खात्याने लावलेला नाही.

काणकोणमध्ये हमरस्ता विभाग असंवेदनशील बनला आहे. यावेळी रामू नाईक, वैष्णव पेडणेकर, क्लेस्टन व्हिएगस, विशाल पागी, सिद्धार्थ नाईक आदी कार्यकर्त्यांची उपस्‍थिती होती.

तथाकथित नेत्यांवर कडक कारवाई गरजेची : रमेश तवडकर

सरकारी अधिकाऱ्यांना कक्षात कोंडून ठेवणाऱ्या तथाकथित नेत्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

करमलघाट रस्त्याची दुरवस्था त्याचप्रमाणे श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती याबाबत पंच रामू नाईक यांनी आज बुधवारी सकाळी उपोषण सुरू केले होते.

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे नेते विकास भगत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या स्थानिक साहाय्यक अभियंत्याच्या कक्षाला टाळे ठोकले होते.

करमलघाट व गुळे येथील अपघातप्रवण रस्त्यांबाबत सरकार संवेदनशील आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Onion Price Goa: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

Kunal Thakur Success Story: दिव्यांगत्वावर मात करत कुणाल ठाकूर बनले पेडणे पालिकेचे मुख्याधिकारी; शिक्षणासह समाजकार्यातही उमटवला ठसा

Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

Mershi Porvorim Traffic: मेरशी-पर्वरी मार्गावर वाहतुकीचा फज्जा; अटल सेतू-उन्नत मार्गाचे पर्याय बंद होताच जुन्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT