37th National Games in Goa: 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा सज्ज, गोव्याच्या तयारीवर ‘ऑलिम्पिक’ संघटना समाधानी

मुख्यमंत्री सावंत ः ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान राज्यात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
37th National Games in Goa
37th National Games in GoaDainik Gomantak

37th National Games in Goa: ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा सज्ज आहे. याचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

तर स्पर्धेसाठीच्या साधनसुविधा आणि इतर तयारीवर आम्ही समाधानी आहोत, असे मत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

आज पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांसह भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा, क्रीडामंत्री गोविंद गावडे, ‘आयओए’ स्पर्धा तांत्रिक समिती प्रमुख अमिताभ शर्मा, ‘आयओए’चे सहसचिव कल्याण चौबे उपस्थित होते.

‘या स्पर्धेसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू असून स्पर्धेतील खेळांसाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधा उभारण्यात आल्या आहेत. यावर ऑलिम्पिक संघटना समाधानी आहे. राज्यातील खेळाचे वातावरण तयार करण्यासाठी या साधनसुविधांचा उपयोग होईल.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने यापुढे इतर पर्यटनाप्रमाणे ‘स्पोर्ट्स टुरिझम’ साठी याचा नक्कीच फायदा होईल’, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या स्पर्धेवेळी गोव्याच्या पारंपारिक लगोरसह काही खेळ प्रकार वाढविण्यात आले असून ते पदके आणि प्रदर्शनीय असतील.

कुस्तीगिरांच्या उपोषणावर लवकरच निर्णय

अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत कारवाईसाठी ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचे दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर उपोषण सुरू आहे.

याबाबत पी. टी. उषा यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, हे प्रकरण केंद्रीय क्रीडा खात्याने गांभीर्याने घेतले आहे. एक समिती स्थापन केली असून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

15 जुलैपर्यंत सर्व तयारी पूर्ण

स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होत असल्या तरी 15 जुलैपर्यंत स्पर्धेसाठीच्या साधनसुविधांची तयारी पूर्ण केली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने अधिकच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात येतील.

ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने स्पर्धा ठिकाणी खेळाडूंसाठीच्या सुविधा आणि इतर साधन सुविधांची पाहणी केली असून या शिष्टमंडळाने आतापर्यंतच्या तयारीवर समाधान व्यक्त केले आहे.

स्पर्धेच्या तांत्रिक समितीची शिष्टमंडळ 27, 28 आणि 29 एप्रिल दरम्यान गोव्याला भेट देत आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.

37th National Games in Goa
Fire At Parcem: पार्से येथे गोदामाला आग; 3.5 लाखांचे नुकसान, एक जखमी

मोदींच्या उपलब्धतेवर स्पर्धेचे उद्‍घाटन

स्पर्धेचे उद्‍घाटन 23, 24 किंवा 25 ऑक्टोबर मोदींच्या हस्ते होईल. पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख मिळाल्यानंतर अंतिम तारीख जाहीर केली जाईल. स्पर्धा प्रथमच गोव्यात होत असल्याने स्पर्धेचे उद्‍घाटन शानदार पद्धतीने फातोर्डा स्टेडियमवर होईल.

तीन क्रीडा प्रकार महाराष्ट्रात : 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद गोव्याकडे असले तरी स्पर्धेतील शूटिंग, गोल्फ आणि ट्रॅक सायकलिंग हे तीन क्रीडा प्रकार साधनसुविधांच्या अभावी महाराष्ट्रात होतील. याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मंत्री गावडे म्हणाले.

37th National Games in Goa
Bicholim News: डिचोलीत एका रात्रीत आठ कार्यालये फोडली

तयारी पूर्ण

पी. टी. उषा म्हणाल्या, गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेची तयारी उत्तम झाली आहे. स्पर्धा अत्यंत चांगल्या व खेळाडू वातावरणात नक्कीच यशस्वी होतील. असोसिएशनचे अमिताभ शर्मा म्हणाले, गोव्यात फुटबॉल खेळाला विशेष स्थान असले.

तरी इतर खेळ प्रकारांमध्येही गोवा पुढे जात आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय स्पर्धेसाठी केलेली तयारी नक्कीच आश्वासक आहे. तांत्रिक बाबींची स्वतंत्र समिती पाहणी करेल. मात्र, आतापर्यंतची तयारी यशस्वी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com