CM Pramod Sawant: सरकारी गृहकर्ज योजना पुढील वर्षापासून होणार पूर्ववत

डॉ. सावंत: शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या ‘मुख्यमंत्री सरल पगार योजने’चा शुभारंभ
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठीची सरकारी गृहकर्ज योजनेसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. त्यानंतर ही योजना पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ‘मुख्यमंत्री सरल पगार योजने’चा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

CM Pramod Sawant
Goa Mine Environmental License: खनिज उत्खननासाठी नव्याने पर्यावरण परवाना आवश्‍यकच!

पैसे काढण्यासाठी खास ॲप

या रिफायन ॲपची नोंदणी प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते. ॲपचे व्यवहार शुल्क नाममात्र आहे. कर्मचारी 10 तारखेपासून चालू महिन्याच्या अखेरीस ॲपवरून पैसे काढू शकतात.

प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत व्यवहाराचा अहवाल संबंधित डीडीओला प्राप्त होईल. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना पैशांची गरज भासते त्यांच्यावरील आर्थिक भार दूर होईल.

CM Pramod Sawant
Arvind Kejriwal : केजरीवालांना बजावलेली नोटीस मागे

आर्थिक अडचण होणार दूर

कधीकधी काही कर्मचाऱ्यांवर अधिकचा आर्थिक भार पडतो आणि बँकांकडून कर्ज घेतात. त्यांच्या गरजा भागविण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरतात.

परंतु रिफायन ॲपद्वारे कोणतेही व्याज न देता आगाऊ पगार काढता येईल. मानव संसाधन सहकारी कर्मचाऱ्यांना याचा खूप फायदा झाला.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com