P. Chidambaram Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काल घेतलेली शपथ आवश्यक होती, कारण... : पी. चिदंबरम

आम्हाला आशा आहे की गोव्यातील लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील आणि आमचे सरकार निवडून देतील; पी चिदंबरम यांचे वक्तव्य

दैनिक गोमन्तक

Goa Congress: गोवा निवडणुकीचे वारे वाहू लागताच गोव्यातील पक्षांतराचे प्रमाणही वाढले होते. या पक्षांतराचा सगळ्यात जास्त फटका कॉंग्रेस पक्षाला बसला होता. एक वेळ अशी आली होती की, गोवा कॉंग्रेसमध्ये फक्त 2 आमदार शिल्लक होते. पण नंतर पुन्हा इतर पक्षातील नेत्यांनी कॉंग्रेसला पसंती दिली आणि कॉंग्रेसमध्ये (Goa Congress) दाखल झाले. आता निवडणूक जाहीर होऊन आणि उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाही अनेकजण पक्षबदल करत आहेत. यासाठी काल कॉंग्रेसने एक वेगळी शक्कल लढवली आणि सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याचे वचन घेण्यात आले.

काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीनंतर (Goa Assembly Elections 2022) पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवी महालक्ष्मी आणि‌ बांबोळी येथील क्रॉससमोर घेतली. निवडणूक झाल्यानंतरही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे यावेळी सगळ्यांनी वचन दिले आहे. कारण या एकंदरीत परिस्थितीचा कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर प्रचंड ताण आला होता.

याचसंदर्भात गोवा कॉंग्रेस प्रभारी पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, 'गोव्याच्या भूतकाळाच्या इतिहासात जर पहिले तर गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक पक्षांतर झाले आहे. निवडणूक तोंडावर असतानाही राजकीय नेते पक्षबदल करत आहेत. त्यामुळे काल घेतलेली शपथ आवश्यक होती. आम्हाला आशा आहे की गोव्यातील लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील आणि आमचे सरकार निवडून देतील.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT