Editor-Director of 'Gomantak' Raju Nayak Dainik Gomantak
गोवा

Goa Education: गोवा घडविण्याची चळवळ पुन्हा सुरू व्‍हावी; शिक्षकांचा सहभाग महत्त्‍वाचा

राजू नायक : शिक्षकदिनी सांतआंद्रेतील निवृत्त शिक्षकांचा हृद्य सत्कार

दैनिक गोमन्तक

गोवा घडविण्याची प्रक्रिया अजूनही संपलेली नाही. गोवा पुढे कसा जाणार, असा प्रश्‍‍न सध्या पडलेला आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोक परप्रांतीय आहेत. गोमंतकीयांचे अस्तित्व टिकवून ठेवून गोवा घडविण्यासाठीची चळवळ पुन्हा एकदा सुरू करण्‍याची गरज आहे.

त्यासाठी निवृत्त शिक्षकांनी हातात छडी घेऊन त्‍यात सहभागी झाले पाहिजे, असे उद्‌गार दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी काढले.

सांत-आंद्रे काँग्रेस गट समितीतर्फे शिक्षकदिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्‍याने नायक बोलत होते. यावेळी सन्‍माननीय अतिथी आमदार ॲड. कार्लुस फेरेरा तसेच साहित्यिक दिलिप बोरकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला काँग्रेस अध्यक्षा बिना नाईक, काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर व मान्यवर उपस्थित होते.

१९६१ मध्ये गोवा मुक्त झाल्यानंतर महाराष्ट्रातून शिक्षक आणण्यात आले. परंतु त्यानंतर गोवा घडविण्याचे कार्य कोणी पुढे नेले नाही. शिक्षकांनी अखंड काम करून गोवा घडविण्यात योगदान दिले आहे. आज सरकारला शिक्षकांची काळजीच नाही. त्यामुळे शिक्षकांच्‍या कामाचे मूल्‍यांकन करण्याचा अधिकार सरकारने गमावला आहे.

- राजू नायक, ‘गोमन्तक’चे संपादक

चांगले नागरिक घडविण्यात शिक्षकांची मुख्य भूमिका आहे. घरी पालक आणि त शिक्षकांचा प्रभाव मुलांवर सर्वांत जास्त असतो. शिकवणे ही एक कला आहे. कितीही उच्च शिक्षण घेतले तरी ही कला कोणाला सहसा येत नाही. आज निवृत्त शिक्षकांनी शिकवणे सुरू ठेवणे आवश्यक आहे.

- ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार

निवृत्त झाल्यानंतर शिक्षकाची कोणीच आठवण काढत नाही. शिक्षक भावी पिढी घडवितात. परंतु आज सरकार त्यांना नोकर म्हणून वागणूक देत आहे. काँग्रेस पक्षाने सांतआंद्रेतील शिक्षकांचा सत्कार केला, त्याप्रमाणे संपूर्ण देशात असे कार्यक्रम झाले पाहिजेत. यातून आम्ही शिक्षकांना विसरलो नाही असा संदेश जाईल.

- दिलिप बोरकर, साहित्यिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT