Govind Gaude : आपले ज्ञान दुसऱ्यांना वाटतो, तोच सर्वश्रेष्‍ठ कलाकार

मंत्री गोविंद गावडे : केरी-फोंडा येथे प्रभाकर धामस्कर स्‍मृती महिला भजनी महोत्सवाचे उत्‍साहात उद्‌घाटन
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Minister of Arts and Culture Govind Gaude: ज्‍या कलाकारामध्ये आवड, छंद चिकाटी हे गुण आहेत, तो कलाकार आपल्या क्षेत्रात यशस्वी भरारी मारतो. जो आपल्याजवळील ज्ञान, कला-कौशल्य निःस्वार्थीपणे इतरांना देतो, तोच कलाकार सर्वश्रेष्ठ ठरतो. यासाठी प्रत्येक नामवंत कलाकारांनी नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करून त्यांना घडवावे, असे प्रतिपादन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.

Govind Gaude
Goa Garbage Issue: कचरावाहू ट्रकांतील घाण पाणी रस्त्यावर

केरी-फोंडा येथील वार्षिक सप्ताह उत्सव समिती व कला-संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रभाकर धामस्कर यांच्या स्मरणार्थ महिला भजनी महोत्सवाचे उद्‌घाटन केल्‍यानंतर गावडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी केरीच्या सरपंचा तृप्ती नाईक, श्री सातेरी देवस्थानचे अध्यक्ष प्रयण धामस्कर, स्थानिक पंच कांचन केरकर, समितीचे अध्यक्ष राजेश परवार, अमोल केरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Govind Gaude
Michael Lobo: कांदोळीत लवकरच आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत

प्रारंभी राजेश परवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा केरकर यांनी केले तर शेवटी कांचन केरकर यांनी आभार मानले.

कलाकार, विद्यार्थी

गौरव सोहळा

ज्येष्ठ गायक व तबलावादक विजय धामस्कर व ज्येष्ठ लोककलाकार लक्ष्मी गुरव केरकर यांचा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आचल नाईक, मिथिल नाईक व स्वरा जल्मी यांचाही गौरव करण्‍यात आला. कला अकादमी आयोजित अखिल गोवा पुरुष भजनी स्पर्धेत प्रथम बक्षीस पटकावलेल्‍या श्री लक्ष्मी भजनी मंडळ सावईवेरे या पथकातील कलाकारांना सन्‍मानित करण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com