Goa Garbage Issue: कचरावाहू ट्रकांतील घाण पाणी रस्त्यावर

मडगाव पालिका क्षेत्रातील 35 टन ओल्या कचऱ्यापैकी 20 टन काकोडा येथे नेण्यात येत आहे.
Goa Garbage Issue
Goa Garbage IssueDainik Gomantak

Goa Garbage Issue: मडगाव पालिका क्षेत्रातील 35 टन ओल्या कचऱ्यापैकी 20 टन काकोडा येथे नेण्यात येत आहे. 10 टन साळगाव कचरा प्रकल्पात नेताना रस्त्यावर अनेक ठिकाणी घाण पाणी सांडत आहे तसेच काही ठिकाणी कचरा रस्त्यावर पडत आहे.

Goa Garbage Issue
Manoj Parab: म्हापसा ‘टीसीपी’वर नेणार मोर्चा

हा प्रकार वारंवार घडल्यास मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक कचरा व्यवस्थापन महामंडळाला थांबवावे लागतील, यासंदर्भातील पत्र पालिकेला पाठवले असून कचरा रस्त्यावर पडणार नाही, याची योग्य दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

काकोडा येथील स्थानिकांकडून मडगावातील कचरा काकोडा कचरा विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पात आणण्यास विरोध केला असला तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात तो महामंडळाच्या विशिष्ट वाहनांतून नेण्यात येत आहे. हा प्रकल्प केपे, सांगे, धारबांदोडा व काणकोण या तालुक्यांतील कचऱ्याची प्रक्रिया करण्यासाठी असल्याचा दावा लोक करत आहेत.

Goa Garbage Issue
Goa Tourism Department: शॅक दुसऱ्याला दिल्यास खबरदार!

त्यासंदर्भातील पत्र कुडचडे-काकोडा पालिकेने महामंडळाला ३१ ऑगस्ट २०२३ रोजी केले होते. आतापर्यंत सुमारे ५० टन कचरा काकोडा येथे नेण्यात आला आहे. काकोडा कचरा प्रकल्पाची क्षमता १०० टन प्रतिदिन आहे. हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. मडगाव पालिकेचा कचरा नेण्यापूर्वी या काकोडा प्रकल्पात अधिकाधिक २३ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली होती.

ऑक्टोबरपासून काम : सोनसडो शेडमध्ये जमा करून ठेवलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेने २.५ कोटी रुपये महामंडळाकडे जमा केल्यावर पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केले जाईल, अशी माहिती महामंडळाचे सदस्य सचिव लेविन्सन मार्टिन्स यांनी खंडपीठाला सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com