International Yoga Day main event at Bambolim Dainik Gomantak
गोवा

International Day Of Yoga: योगदिनानिमित्त बांबोळीत कार्यक्रम; राज्‍यात २५० योग शिबिरे सुरू

International Day Of Yoga: योगदिनाचा मुख्य कार्यक्रम डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्‍ये होणार; राज्यात २५० ठिकाणी योग शिबिरे सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

International Day Of Yoga: दहाव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी राज्यातील मुख्य कार्यक्रम बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्‍ये होणार आहे. सकाळी साडेसहा वाजता योग प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. शिवाय तालुका आणि गाव पातळीवर सकाळी ७ ते ८.३० पर्यंत योग शिबिरे होणार आहेत.

सध्या राज्यात २५० ठिकाणी योग शिबिरे सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी दिली. शालेय माध्यान्ह आहारात भरडधान्यांपासून तयार केलेल्या अन्नपदार्थांचा कसा समावेश करता येईल याचे प्रशिक्षण माध्यान्ह आहार पुरवठादारांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुख्‍यमंत्र्यांनी आज मंत्रालयात सद्‍गुरू योग गुरुकूल, आर्ट ऑफ लिव्‍हिंग, प्रजापती ब्रह्माकुमारी, पतंजली योग समितीचे प्रतिनिधी, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, क्रीडा सचिव श्‍‍वेतिका सचन, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर, इमॅजिन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिगीस यांच्या उपस्थितीत आयोजनासाठीची उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, गाव पातळीवर योग शिबिर आयोजित करायचे असल्यास सरकार मोफत प्रशिक्षक पुरवणार आहे. या बैठकीत सहभागी संस्थांकडेही जनता यासाठी संपर्क साधू शकेल किंवा क्रीडा खात्याकडे संपर्क साधण्यात यावा. ७४० प्राथमिक शिक्षकांना योग प्रशिक्षण दिले असून त्यांनी दररोज एक शालेय तास योगाभ्यासासाठी द्यावा असे अपेक्षित आहे. सरकार सक्ती करणार नाही.

सरकार उपलब्‍ध करून देणार प्रशिक्षण

महिलांना योगासनांचे प्रशिक्षण देण्यासाठी १३ जूनपासून म्हापसा, मोरजी, बायणा, काकोडा, डिचोली, होंडा आदी ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. आरोग्य संचालनालयाअंतर्गत असलेले आयुष डॉक्टर्सही योगाभ्यासाविषयी मार्गदर्शन करत असतात. आंतरराष्ट्रीय योगदिनच नव्हे तर पुढेही योग शिबिरांसाठी इच्छुक असलेल्यांनी संपर्क साधल्यास त्यांना योग प्रशिक्षक सरकार उपलब्ध करेल. जास्तीत जास्त जनतेने योगाभ्यासाकडे वळावे असे सरकारला वाटते, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

आजार टाळण्‍यासाठी भरडधान्यांचा आहार घ्‍या

राज्यात मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण वाढत असल्याचे नमूद करून मुख्‍यमंत्री म्हणाले, भरडधान्यांचा वापर आहारात वाढवून जीवनशैलीविषयक आजार नियंत्रणात ठेवता येतात. यासाठी जनतेने भरडधान्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा. आजवर नाचणीचे उत्पादन राज्यात होत होते. त्या जोडीला आता वरीचेही उत्पादन घेतले जाते. मागणी वाढल्यावर शेतकरी अन्य भरडधान्यांच्या उत्पादनाकडे वळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT