Yoga For Eyes: डोळ्यांचे 'हे' 6 व्यायाम केल्याने कमी होईल चष्म्याचा नंबर

तुम्हाला जर चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर तुम्ही हे सहा प्रकारचे व्यायम करू शकता.
Yoga For Eyes
Yoga For EyesDainik Gomantak
Published on
Updated on

आजकाल लॅपटॉप आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. याचा परिणाम डोळ्यांवर जास्त दिसून येतो. यामुळे लहान वयात देखील नंबरचा चष्मा लावावा लागतो. लॅपटॉप किंवा मोबाइल फोनच्या स्क्रीनकडे तासनतास टक लावून पाहिल्याने केवळ दृष्टी कमी होत नाही तर आरोग्यालाही मोठी हानी होते.

जर तुम्हालाही सर्वकाही स्पष्टपणे दिसत नसेल आणि तुमची दृष्टी कमी होत असेल तर तुमची लाइफस्टाइल आणि आहारामध्ये बदल करणे गरजेचे आहे. तसेच डोळ्यांचे काही व्यायम केल्यास तुमच्या चष्माचा नंबर कमी होऊ शकतो.

  • अपडाऊन मुव्हमेंट

यासाठी सर्वात पहिले रिलॅक्स बसावे आणि पाठ सरळ करून बसावे. यानंतर डोळे पहिले वर आणि नंतर खाली फिरवावे. हा व्यायाम दररोज 10 वेळा करावा. यासाठी पाच सेकंद डोळे बंद केल्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा आणि डोळे उघडावे. यामुळे दृष्टी सुधारते.

  • लेफ्ट राइट मुव्हमेंट

यासाठी सर्वात पहिले रिलॅक्स बसावे. नंतर डोळे शक्य असेल तर तेवढे उजवीकडे किंवा डावीकडे फिरवावे. यानंतर डोळ्यांना आराम मिळावा यासाठी पाच सेकंद डोळे बंद करावे. हा व्यायाम 10 मिनिटे करावा. यामुळे दृष्टी सुधारेल.

Yoga For Eyes
Astro Tips: पुजा करताना जांभई देणे शुभ की अशुभ? अशा लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
  • डायगोनल मुव्हमेंट

यासाठी डोळे वर उजव्या कोपऱ्यात आणि नंतर खालच्या डाव्या कोपऱ्यात घ्यावे. यानंतर डोळ्यांना आराम देण्यासाठी काही सेकंद डोळे बंद करावे आणि नंतर डोळे वर डाव्या कोपऱ्यात आणि खालच्या डाव्या कोपऱ्यात फिरवावे. या दोन्ही प्रक्रिया 10-10 वेळा करावे.

  • क्लॉकवाइज मुव्हमेंट

यासाठी डोळ्यांना क्लॉकवाइज फिरवावे. हा व्यायाम दररोज 10 वेळा करावा आणि नंतर डोळ्यांना आराम देण्यासाठी काही सेकंद डोळे बंद ठेवावे. यामुळे दृष्टी सुधारते.

  • ब्लिंकिंग मुव्हमेंट

या व्यायामामध्ये डोळे पटकन बंद करा आणि उघडा. हा व्यायाम 10 सेकंदांसाठी करावा. घर किंवा ऑफिसचे काम करतानाही तुम्ही हा व्यायाम करू शकता. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com