Monsoon Dainik Gomantak
गोवा

Monsoon News: खूशखबर... अंदमान बेटावर धडकला मान्सून

गोव्यातही वेळेत दाखल होण्याची शक्यता : 22-23 रोजी मेघगर्जनेसह सरी बरसणार

गोमन्तक डिजिटल टीम

Monsoon News बहुप्रतिक्षित मान्सून अखेर अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूनने हजेरी लावली आहे.

दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, निकोबार आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागांत मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. अशी स्थिती राहिल्यास मान्सून केरळ आणि गोव्यातही वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे.

येत्या तीन-चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.  

यावेळी मान्सून एक जूनऐवजी चार जूनला  केरळमध्ये  दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच व्यक्त केला होता.

गोव्यात 6 ते 10 जूनपर्यंत आगमन : स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार गोव्यात मान्सूनचे आगमन 6 ते 10 जूनपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मुंबईत15 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल. यंदा भारतामध्ये सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला, तरी यात बदल होण्याची शक्यता स्कायमेट संस्थेने व्यक्त केली आहे.

उष्णतेची लाट

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल वेगाने सुरू झाल्याने अरबी समुद्र आणि संलग्न भूखंडीय प्रदेशात मोठे हवामान बदल जाणवत आहेत. परिणामी पुढील काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते.

दक्षिण उत्तर प्रदेशात 20 ते 22 मे दरम्यान, देशाच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तसेच गोव्यात 22 व 23 मे रोजी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: रोहन यांच्या BCCI फेरनियुक्तीस ‘खो’! संयुक्त सचिवपद राखणे अशक्य; जीसीए प्रतिनिधी नेमणूक मुदत हुकली

Arambol: जंगल भागात झाडांची कत्तल! हरमल ग्रामस्थ संतप्त; तक्रारीनंतर पंचायत मंडळाने केली पाहणी

Goa Politics: खरी कुजबुज; ...मडगावकर मतदान करणार नाहीत!

Goa Live Updates: वेर्ण्यात कॉंक्रिट मिक्सरची धडक; एकजण ठार

Bits Pilani: ऋषी नायरला ड्रग्स कुठून मिळाले? त्याच्या खोलीत कोण आले होते? 'बिट्स पिलानी'तील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT