Goa Revolution Day Dainik Gomantak
गोवा

Goa Revolution Day 2023: क्रांतिदिनाचा इतिहास आता अकरावीच्या पुस्तकातही, शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची माहिती

मुख्यमंत्री : आझाद मैदानावर आदरांजली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Revolution Day 2023: 18 जूनच्या क्रांतिदिनाचा इतिहास मोठा प्रेरक आहे. हा इतिहास यापूर्वी चौथीच्या बालभारती पुस्तकात होता.

आता यापुढे तो अकरावीच्या पुस्तकात 1946 ते 1961 असा सविस्तर रूपाने विद्यार्थ्यांना शिकवला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. गोवा क्रांतिदिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज, रविवारी पणजीत झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

पणजीतील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, पोलिसप्रमुख जसपाल सिंग यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गोवा पोलिस दलाकडूनही सलामी देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांप्रति आमचे सरकार आदर आणि सन्मान व्यक्त करते. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. येत्या वर्षातील १८ जूनपूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांच्या नोकऱ्यांचा प्रश्न १०० टक्के सोडवला जाईल.

बहुतांश स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना नोकऱ्या दिल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या घेतल्या नाहीत. ज्या पेन्शनधारकांची पेन्शन तांत्रिक कारणाने बंद झाली आहे, तीही येत्या महिन्याभरात मिळेल, अशी सोय केली जाईल.

याशिवाय येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या पुस्तकात 18 जूनच्या गोवा मुक्ती लढ्याचा सविस्तर इतिहास मुलांना शिकवण्यात येईल.

राज्य सरकार केंद्र सरकारच्या साहाय्याने ज्या विविध योजना राबवत आहे, त्या लोकांच्या हिताच्या असून राज्य सरकारच्या वतीने कोडिंग आणि रोबोटिक, स्टार्टअप अक्षय- सौर ऊर्जा धोरणही राबवले जात आहे.

स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानाने जगू द्या!

अनेकांनी प्राणांच्या आहुती देऊन गोवा मुक्त केला. मात्र, त्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यांना सन्मानाने जगू द्या आणि सुखाने मरू द्या, असे आवाहन गुरुदास कुंदे यांनी केले. आज गोवा मुक्तीला 63 वर्षे झाली, तरी स्वातंत्र्यसैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, काहींची पेन्शन बंद झाली आहे. आता हाताच्या बोटांवर मोजण्याइतके स्वातंत्र्यसैनिक जीवंत आहेत. आमच्याकडे मते नाहीत; पण तत्त्व आहे. जे हयात आहेत, त्यांना सन्मानाने जगू द्या.

मद्यविक्री नको!

क्रांतिदिनाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरुदास कुंदे म्हणाले की, राज्यातील आग्वाद, रेईश मागूशसारखे किल्ले आमच्यासाठी मंदिर आहेत.

तिथे अनेक स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यात आले होते. तिथे दारू विक्रीसारखे गैरप्रकार केले जाऊ नयेत, असे सांगत त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांसंबंधीच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT