Margao Crime: दवर्ली पंच सदस्‍यावर सुरीहल्‍ला; एकाला अटक, वादाला धार्मिक रंग

नागरिकांचा मोर्चा; वातावरण तंग, बेकायदा मदरसा बंद करा; हिंदू संघटनांची मागणी
Margao Crime
Margao CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Crime रुमडामळ-दवर्लीचे पंच विनायक वळवईकर यांच्यावर शनिवारी रात्री सुरीहल्ला झाला. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी आयुब खान या संशयिताला अटक केली. या घटनेनंतर दवर्लीतील वातावरण रविवारी सायंकाळी तंग झाले.

येथील बेकायदा मदरसा त्वरित बंद करावा आणि येथील मुस्लिमांची बीफची दुकाने बंद करावीत, अशी मागणी करत आज येथे हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. पोलिसांनी मोठी कुमक तैनात केली असून, परिसराला छावणीचे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे.

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वळवईकर आपल्या कारमधून जात असता, फोन कॉल घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबविली. त्यावेळी एका व्यक्तीने जड वस्तूने त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांच्यावर सुऱ्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी ते पुढे वाकल्याने सुऱ्याचा वार गाडीच्या सीटवर बसला. वळवईकर यांनी प्रसंगावधान राखून गाडीचे दार उघडून मारेकऱ्याला ढकलल्याने तो पळून गेला. यावेळी हल्लेखोराने मास्क घालून तोंड झाकले होते, अशी माहिती वळवईकर यांनी दिली.

येथील आणखी एक पंच समिउल्ला फणिबंद यांच्या गाडीवर दगडफेक करून मोडतोड केल्याची तक्रार पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी खान याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपेश शेटकर पुढील तपास करत आहेत.

Margao Crime
National Games : स्वातंत्र्याच्या अमृतकाळात ऐतिहासिक क्रीडापर्व : मुख्यमंत्री डॉ. सावंत

अवैध व्यवसायांचे पेव

सासष्टीचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तणाव कमी झाला. स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी मायणा- कुडतरी, मडगाव, फातोर्डा, कोलवा आणि कुंकळ्ळी येथील पोलिसांना दवर्लीत पाचारण केले होते.

रुमडामळ भागात जी बीफची दुकाने आहेत, त्यांना ‘एफडीए’चा परवाना नाही आणि इतर बेकायदेशीर विक्रेते येथे व्यवसाय करतात, त्यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वळवईकरांच्या घराला संरक्षण

नेहमीच हिंदू-मुस्लिम यांच्यातील तणावासाठी कुप्रसिद्ध असलेल्या रुमडामळ हाउसिंग बोर्डमध्ये हा वाद पुन्हा उफाळल्याने आज कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या भागात पोलिसांची गस्त असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

पंच वळवईकर यांच्या घराभोवती तसेच अंजुमन शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात होते. तसेच या भागातील पोलिस चौकीवर पोलिसांची कुमक वाढविली आहे.

दोन गटांत तेढ

मदरशाच्या वादावरून ठिणगी

१ पंचायत बैठकीत मदरसा हटवा, अन्यथा मी तिथे डुक्कर आणून टाकेन,असे वक्तव्य वळवईकर यांनी केल्याने वाद चिघळला होता.

२ वळवईकर यांना व्हॉट्सॲपवर धमकी देण्यात आली होती. सुरीहल्ला त्यातूनच झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

३ रुमडामळ ही पंचायत पूर्वी भाजपकडे होती आणि वळवईकर तिथे सरपंच होते.

४ भागातील सर्व मुस्लिमांनी भाजप पुरस्कृत पॅनलला हरवून पंचायत ताब्यात घेतली होती. तेव्हापासून दोन गटांत वाद.

५ या कथित अवैध मदरशाला विद्यमान पंचायत मंडळाचा पाठिंबा आहे, असा आरोप वळवईकर यांनी केला होता.

Margao Crime
Anjuna Police : अश्लिल फोटो पाठवून महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या म्हापशातील युवकाला अटक

विनायक वळवईकरांना ‘फेसबुक’वरून दिली होती धमकी

पंच विनायक वळवईकर यांनी यापूर्वी रुमडामळ-दवर्लीच्या ग्रामसभेत या मदरशाला विरोध केला होता. शनिवारी रात्री जो खुनी हल्ला झाला, त्यामागे हेच प्रकरण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तथापि, वळवईकर यांना वास्को येथील रियान खान याने ‘फेसबुक’वरून धमकी दिली होती. त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी आज मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित कार्यकर्ते उपस्थित होते, असे सांगण्यात आले.

बीफच्या दुकानांवर तुफान दगडफेक

या प्रकरणाला हिंदू - मुस्लिम वादाचे वळण लागल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. रविवारी काही मुस्लिमांच्या बीफ विकण्याच्या दुकानांवर दगडफेक केल्याचीही माहिती प्राप्त झाली.

भगवती वस्तीवर कारवाई करा!

भगवती वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी काही युवक ड्रग्सचे सेवन करतात. वळवईकर यांच्यावर हल्ला करणारा संशयित येथील असल्याने या भागावर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.

निदर्शक तितकेच पोलिस : रुमडामळ-दवर्ली भागाला आज रविवारी पोलिसांचा वेढा पडला होता. पंच वळवईकर यांच्यावर हल्ला केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढल्याने रविवारी बराच काळ वातावरण तंग होते. सुमारे दीडशे ते दोनशे निदर्शक दवर्लीत पोचले होते. शिवाय पोलिसही त्यांच्याच संख्येइतके तैनात केले होते. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com