रविंद्र भवन बायणा येथे बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉक्टर कल्पना महात्मे Dainik Gomantak
गोवा

वास्को वासियांसाठी डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या ठरली डोकेदुखी

एकाच दिवशी 10 डेंग्यू रुग्ण (Dengue patient) तर पाच संशयित रुग्ण आढळल्याची माहिती डॉक्टर कल्पना महात्मे यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: डेंग्यू रुग्णांची (Dengue patient) वाढती संख्या वास्को वासियांसाठी डोकेदुखी व भयावह ठरली असून यावर तातडीची उपाययोजना आखण्यासाठी आरोग्य खात्यातर्फे (Health Department) नगरसेवक व शहरातील नामांकित व्यावसायिक कंपन्यांची बैठक घेऊन त्यांना डेंगू रोगावरील (Dengue disease) नियंत्रण आणण्यासाठी विविध सूचना केल्या. गेल्या आठवड्यात वास्कोत 85 संशयित रुग्ण (Patient) तर आज एकाच दिवशी 10 डेंग्यू रुग्ण (Dengue patient) तर पाच संशयित रुग्ण आढळल्याची माहिती डॉक्टर कल्पना महात्मे यांनी दिली.

सध्या राज्यात मलेरियाचे रुग्ण आणि मृत्यू कमी होत चालले असले तरी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तापसदृश्य रुग्णांना डेंगू आणि मलेरियाची चाचणी करणे सुद्धा सक्तीचे केले आहे. जसे कोरोना विषाणू म्यूटंट तपासले जाते तसेच डेंगूच्या विषाणूचेसुध्दा तपासले जात असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावेळी डेंग्यू विषयी माहिती डॉक्टर रवी कृष्णा यांनी दिली. आठवड्यातून किमान एकदा कुलर्समधून आणि इतर लहान भांड्या मधून पाणी काढून टाकावे, पाय आणि हात उघडे राहतील असे कपडे वापरू नये. नारळाच्या करवंट्या, लहान भांडे या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते अशी महत्वपूर्ण माहिती या बैठकीत आरोग्य खात्यातर्फे उपस्थितांना देण्यात आली. या बैठकीला मुरगाव पालिकेच्या 25 प्रभागातील नगरसेवक तसेच गोवा शिपयार्ड, गॅमन इंडिया कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना या बैठकीत खास आमंत्रित करण्यात आले होते. कारण या कंपनीकडे जास्त कर्मचारी असून या कंपन्या बांधकाम क्षेत्र निगडित आहे.

कोरोना काळात कित्येक दिवसांपासून राज्यातील बांधकाम प्रवण क्षेत्र बंद होते. तेव्हा ठेवलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. हेसुद्धा प्रसाराचे मोठे कारण असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. याविषयी कंपन्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. आरोग्य खाते एकाच वेळी सर्व ठिकाणी पोचू शकत नाही तेव्हा नगरसेवकांनी या कामी आरोग्य खात्याला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात वास्को शहरात 13 डेंग्यू रुग्ण सापडले. त्यानंतर जून महिन्यात 60 , जुलै महिन्यात 160 तसेच ऑगस्ट महिन्यात मागच्या दोन आठवड्यात149 रुग्ण सापडले असून यात 85 संशयित रुग्ण सापडले तर आज ऐकूण 10 डेंग्यू रुग्ण तर पाच संशयित रुग्ण सापडले असल्याची माहिती डॉक्टर महात्मे यांनी दिली.

दरम्यान डेंग्यूचा रुग्णांची वाढती संख्या वास्को शहरासाठी घातक ठरत असून यावर उपाययोजना आखण्यासाठी शहर आरोग्य खात्याची धावपळ उडाली आहे. बायणा भागात जास्त रुग्ण आढळत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तर दुसरा नंबर कदंब बस स्थानक जवळील भागात डेंग्यू रुग्ण संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT