Atal Setu Closure
Atal Setu Closure Dainik Gomantak
गोवा

Atal Setu Closure: अटल सेतू वाहतुकीस बंद; वाहनचालकांत संतापाची लाट

दैनिक गोमन्तक डिजिटल

Atal Setu to be Closed for Repairs: राज्यात होणाऱ्या जी-20 बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर अटल सेतूच्या डागडुजी व डांबरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आजपासून हा पूल बंद करण्याचा निर्णय झाल्याने वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याने आता पुन्हा वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागून चक्काजाम होणार आहे.

हे काम कधी पूर्ण होईल याचा थांगपत्ता नाही त्यामुळे पणजी - मेरशी तसेच पणजी - पर्वरी या मार्गावर वाहतूक कोंडी होणार आहे.

गेल्या मार्च महिन्याच्या अखेरीस अटल सेतूच्या डागडुजीचे काम तसेच डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या पुलावरून जाणारी वाहने दोन्ही मांडवी पुलावरून वळवण्यात आली होती.

पर्वरीकडून पणजीकडे येणाऱ्या व मेरशीकडे जाणाऱ्या वाहनांच्या तसेच पणजीहून पर्वरी तथा मेरशीकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागत होत्या. या वाहनांच्या रांगा सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत लागत होत्या. सुमारे एक आठवड्याहून अधिक काळ लोकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते.

पर्वरी ते पणजीत येण्यासाठी अर्धा ते एक तास रांगेत राहावे लागत होते. वाहतुकीच्या चक्काजाममुळे मुख्यमंत्र्यांनी त्याची पाहणी करून अटल सेतूवरील पणजीहून पर्वरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एक लेन सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यामुळे ही वाहतूक कोंडी पणजीहून पर्वरीकडे जाण्यास कमी झाली तरी पर्वरीहून पणजीत येताना होणारी कोंडी कायम होती.

या अटल सेतूवरील डागडुजी व डांबरीकरणाचे काम सुरू असलेल्या कामात एक लेन सुरू केल्याने अडथळे येत आहेत. या डांबरीकरणासाठी आणलेल्या यंत्रापैकी काही यंत्रामध्ये वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी हे डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.

हे काम वेळेत सुरू होण्याची शक्यता नसल्याने अटल सेतू वाहतुकीसाठी काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. हा पूल बंद ठेवल्याने वाहतुकीचा सर्व ताण दोन्ही मांडवी पुलावर येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होणार आहे.

पुन्हा आता पणजी, पर्वरी व मेरशी या तीन ठिकाणी वाहतुकीचा फज्जा उडणार आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक सिग्नल्स बंद ठेवून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम वाहतूक पोलिसांना करण्याची पाळी येणार आहे.

परीक्षार्थींना बसणार फटका

विधानसभा अधिवेशन सुरू असताना सरकारने वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी काही काळ अटल सेतूवरील एक लेन सुरू ठेवली व आता विधानसभा संपल्यावर ती पुन्हा बंद केल्याने वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सध्या राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. या वाहतुकीच्या कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेवर पोहचण्यास बसू शकतो. सरकार लोकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासाबाबत विचार न करताच हे निर्णय बदलत आहे.

वाहनचालकांनी सहकार्य करावे

"अटल सेतूच्या कामात अडथळे येत असल्याने हा पूल सर्वच वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झाला आहे. या पुलामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर आयआरबी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे."

"गृहरक्षकांना ठिकठिकाणी तैनात करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी रांगा लावूनच एकामागोमाग एक या पद्धतीने वाहतूक करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे."

- बोसुएट सिल्वा, पोलिस वाहतूक अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT