Goa BJP And Congress
Goa BJP And Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: दक्षिण गोव्यात उमेदवार कोण, यावरच काँग्रेसचे भवितव्य !

दैनिक गोमन्तक

Goa Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारांवर प्रभाव नाही, असे म्हणता येणार नाही; बुथस्तरावर भाजप मजबूत आहे. याउलट कॉंग्रेसमध्ये नेते, तसेच संघटनात्मक बांधणीची कमतरता आहे. जर दक्षिणेत कॉंग्रेसने योग्य चेहरा दिला, तर दक्षिणेतील पारंपरिक मते कायम राहतील.

अन्यथा या पक्षाचा निभाव लागणे कठीण आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक ॲड. क्लियोफात कुतिन्हो यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या चर्चेत प्रा. मनोज कामत यांनीही सहभाग घेतला. संपादक-संचालक राजू नायक यांनी या चर्चेचे संचलन केले. कुतिन्हो म्हणाले की, भाजपने हिंदु मतांवर लक्ष केंद्रीत केले असल्याने जागतिक स्तरावर ‘सर्वसमावेशक लोकशाही’ अशी प्रतिमा असलेल्या भारताच्या प्रतिमेला धोका निर्माण होणार आहे. बहुमत असणाऱ्यांनी अल्पसंख्याकांना सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे.

विरोधकांनी गमावली संधी

एकेकाळी कॉंग्रेसमध्ये बऱ्याच कुरघोड्या होत होत्या; परंतु त्याची लागण आता भाजपमधील आमदारांनाही झाली आहे. सभापती रमेश तवडकर आणि कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यातील वाद ऐन विधानसभेत उफाळला. परंतु, हा वाद पेटवायला विरोधी कमी पडले. तवडकर, गावडे हे दोघेही एसटी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या या वादामुळे समाजाच्या आंदोलनाला फटका बसेल. त्यातही ‘उटा’ संघटनेचे प्रकाश वेळीप हे गावडेंसोबत असल्याने तवडकरांची कोंडी झाली, असे ॲड. क्लियोफात कुतिन्हो म्हणाले.

कॉंग्रेसकडे नेतृत्वाचा नेहमीच अभाव

राज्यात कॉंग्रेसकडे नेतृत्व करणारा लोकनेता नाही. जे होते, ते आता भाजपमध्ये आहेत. विरोधकांनी विधानसभेत ज्या पोटतिडकीने जनसामान्यांचे प्रश्‍न मांडायला हवे होते, तसे झाले नाही. उत्तर गोव्यात भाजपचा उमेदवार ९० हजार ते १ लाख मतांनी सहजपणे निवडून येईल, यात शंका नाही. कारण यापूर्वी कॉंग्रेस हे अल्पसंख्याकांना झुकते माप देते, असे बोलले जायचे. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंच्या प्रश्‍नांबाबत यापूर्वी विचार होत नव्हता.

आता कोठे त्यांचे प्रश्‍न हाताळले जात आहेत, अशा बहुसंख्य हिंदूंच्या भावना आहेत. त्यामुळे हाच मुद्दा घेऊन भाजप मार्गक्रमण करेल, असे प्रा. मनोज कामत म्हणाले.

अभ्यासू नेत्यांची कमतरता

विधानसभेत जनतेचे तसेच विविध घटकांचे मुद्दे विरोधकांनी पोटतिडकीने मांडायला हवेत; परंतु बजेट अधिवेशनात विरोधक कमी पडल्याचे दिसले. कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड या पक्षांमध्ये समन्वय नव्हता. सरदेसाई यांची एकट्याची शिकस्त वगळता इतरांनी निराशा केली. पर्रीकर यांच्यानंतर आता अभ्यासू नेता नसल्याची खंत प्रा. कामत यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT