Suchna Seth: आपल्या चिन्मय या चार वर्षाच्या मुलाचा खून केल्याच्या आरोपावरून 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेली सूचना सेठ मानसिकदृष्ट्या आजारी असून तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी, अशी वडील जॉय गोपाल सेठ यांनी बाल न्यायालयात याचिका सादर केली आहे.
तर सूचनाची मानसिक स्थिती ठीक असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्याबाबत तज्ज्ञांचा अहवाल त्यांनी न्यायालयात सादर केला. याप्रकरणी 21 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अहवालावर या खटल्याचे भवितव्य अवलंबून आहे.
आत्महत्येची लक्षणे नाहीत !
गेल्या आठवड्यात गोपाल यांनी याचिका सादर केली होती. त्याला उत्तर देताना गोवा पोलिसांनी न्यायालयात बांबोळीच्या मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेचा अहवालच सादर केला आहे. त्यात ती प्रश्नांची सामान्यपणे उत्तरे देते, तिच्याच आत्महत्येची लक्षणे दिसून येत नाहीत, असे नमूद केले आहे.
आपल्याच मुलाच्या खून प्रकरणात संशयित सूचना सेठला सुनावण्यात आलेली सहा दिवसांची पोलीस कोठडी रविवारी (14 जानेवारी) पूर्ण झाली. पणजी बाल न्यायालयाने सूचनाच्या पोलीस कोठडीत सोमवारी (दि.15) पाच दिवसांची वाढ केली आहे.
यामुळे सूचना सेठचा जेलमधील मुक्काम पाच दिवसांनी वाढला
सिकेरी येथे गेल्या घडलेल्या चार वर्षीय मुलाचा आपल्याच आईने केलेल्या हत्या प्रकरणामुळे देशात खळबळ निर्माण झाली. संशयित सूचनाला अटक केल्यानंतर तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
संशयित सूचना तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर कळंगुट पोलिसांनी सूचनाला घटनास्थळी घेऊन जात घटनाक्रम रिक्रिएट केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.