Goa Politics: केंद्रात युती तुटली तरी गोव्यात एकी राहावी

Goa Politics: हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने काँग्रेसची दाणादाण उडवली आहे.
Goa Politics:
Goa Politics: Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने काँग्रेसची दाणादाण उडवली आहे. राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर संपूर्ण देशात हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले, असा आभास निर्माण केला गेला आहे. प्रत्यक्षात वास्तव तसे नाही. तरीही विरोधकांच्या छातीत धडकी भरण्यासाठी हे चित्र पुरेसे ठरले.

काठावर बसलेल्या विरोधी पक्षांतील नेत्यांनी भाजपात उड्या मारणे सुरू केले. ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्याची भाषा करणाऱ्या काही घटकांनी भाजपशी हातमिळवणी करणे पसंत केले.

बिहारात नितीश कुमारांनी भाजपशी संसार थाटला. ममता बॅनर्जी यांनी ‘इंडिया’शी सवतासुभा घेतला. या शृंखलेत आपनेही पंजाब, दिल्लीवर दावा करून काँग्रेसमसोर आपले इरादे स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर आपने लोकसभेसाठी आपले 3 ठिकाणी उमेदवार जाहीर केले. त्यात दक्षिण गोव्यासाठी आमदार वेन्झी व्हिएगस यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले.

Goa Politics:
Margao News: मडगाव उपनगराध्यक्षपदी बबिता नाईक यांची बिनविरोध निवड

वास्तविक, दक्षिण गोव्यात सध्या काँग्रेसचा खासदार कार्यरत आहे. तेथे काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे, असे काही सर्वे सांगत आहेत. काँग्रेसला विचारात न घेता आपने परस्पर व्हिएगसना उमेदवारी दिल्याने ‘इंडिया’ आघाडीला तो शेवटचा खिळा ठरला, असे निष्कर्ष अनेकजण काढत आहेत.

परंतु या स्थित्यंतरामागे ‘आप’ची नियोजनबद्ध योजना दिसते. लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अशावेळी राहुल गांधी रणनीती आखण्याऐवजी न्याय यात्रेत व्यग्र आहेत. परिणामी काँग्रेसकडे पुढे जाण्याचे धोरण नाही, अशी ‘इंडिया’मधील घटकांची मानसिकता बनली आहे. अशावेळी गोव्यातील आपचे संयोजक व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समन्वयाची भूमिका दाखवली आहे जी वाखाणण्याजोगी आहे.

Goa Politics:
Suchna Seth: सूचना मानसिकदृष्ट्या सक्षम; पोलिसांचा दावा; आत्महत्येची लक्षणेच नाहीत

काँग्रेसला गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवायच्या आहेत, तर ‘आप’ने २०२७मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य बाळगले आहे. उद्या मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत कॉंग्रेसला अपेक्षित तोडगा निघण्याची शक्यता आहे. ‘आप’ने उमेदवार जाहीर करून अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस हायकमांडना तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडले आहे, असा सरळ अर्थ वेन्झी यांच्या नावाच्या घोषणेतून काढता येतो.

केंद्रात युती तुटली तरी गोव्यात एकी राहावी, अशी भूमिका आपने घेतली आहे. परंतु टाळी एका हाताने वाजत नाही. भाजपला शह देण्याच्या उद्देशाने खरेच मार्गक्रमण करायचे असेल तर किमान समान कार्यक्रम ठरवावा लागेल. ते उत्तरदायित्व काँग्रेसला निभावावे लागेल. त्यांच्या नेत्यांनी बाष्कळ विधाने टाळावीत. इतर पक्षांना विचारात घ्यावे लागेल. असा समंजसपणा काँग्रेसने यापूर्वी कधी दाखवलेला नाही.

केवळ चर्चा करून पुरेसे नाही, निर्णय घेण्यात शहाणपण असते, हे काँग्रेसने लक्षात घ्यावे. २०१४साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सावईकरांविरोधात ११ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत भाजप व कॉंग्रेसमध्ये झाली. परंतु भाजपविरोधी मते विभागली गेली, सावईकरांनी ३२ हजार मतांनी आघाडी घेऊन कॉंग्रेसच्या रेजिनाल्डला नमवले. परंतु २०१९च्या निवडणुकीत मित्रपक्ष मगो भाजपसोबत नव्हता.

तसेच अंतिम रिंगणात केवळ ६ उमेदवार असल्याने कॉंग्रेसची फारशी मते फुटली नाहीत. सार्दिन ४७ टक्के मिळवून खासदार झाले, सावईकरांची ३ टक्के मते कमी झाली होती. परंतु आता मगोप भाजपसोबत आहे. विरोधकांना एकी न दाखवल्यास दक्षिणेतील जागेला गवसणी घालणे भाजपला अवघड नाही.

केंद्रात युती तुटली तरी गोव्यात एकी राहावी, अशी भूमिका आपने घेतली आहे. परंतु टाळी एका हाताने वाजत नाही. भाजपला शह देण्याच्या उद्देशाने खरेच मार्गक्रमण करायचे असेल तर किमान समान कार्यक्रम ठरवावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com