माजी सरपंचाचा सरकारला खोचक सवाल  Dainik Gomantak
गोवा

तुये हॉस्पिटलचे की इमारतीचे उद्घाटन ; माजी सरपंचाचा सरकारला खोचक सवाल

तुये हॉस्पिटलचे अर्धवट स्थितीत उद्घाटन करीत असल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी : तुये येथील ५२ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये बांबोळी हॉस्पिटल (Bambolim Hospital) वगळता तुये येथे मृतदेह (Dead bodies) ठेवण्याची सुविधा आहे, दोन ऑपरेशन थेटर आहे, १०० खाटांचे हॉस्पिटल इमारत (100-Bed hospital building) तयार आहे. मात्र ज्या सुविधा हव्यात त्या उपलब्ध नसताना सरकार (Government) हॉस्पिटलचे 2 ऑक्टोबर रोजी उद्घाटन करणार की केवळ इमारतीचे असा खोचक सवाल तुयेचे माजी सरपंच निलेश कांदोळकर, विलासिनी नाईक आणि विद्यमान पंच आनंद साळगावकर यांनी पत्रकार परीशाधेत सरकारला विचारलेला आहे.

पेडणे तालुक्याच्या विचार केला तर कॉंग्रेस आणि भाजपा सरकारने तालुक्यातील अर्धवट प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा चुकीचा पायंडा घातला आहे. आणि उद्घाटन केल्यावर हे प्रकल्प धूळखात पडलेले आहेत. कॉंग्रेस सरकारच्या काळात नगरपालिका मंत्री जोकिम आलेमाव असताना पेडणे येथील पालिकेचे गर्दन अर्धवट स्थितीत असताना उद्घाटन केले. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात नगरपालिका मंत्री फ्रान्सीस डेसौझा असताना अर्धवट पेडणे पालिकेचा कचरा प्रकल्प शुभारंभ केला; तो आजही धूळ खात पडला आहे.

त्यानंतर भाजपा सरकारच्या काळातच मुख्यमंत्री पार्सेकर रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांनी पेडणे अर्धवट असलेला बसस्थानकाचे उद्घाटन केले त्यानंतर परत एकदा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले तो आजही प्रकल्प अर्धवट आहे. शिवाय नुकतेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी चोपडे ते मोरजी पर्यंतच्या सायकल ट्रेक चे उद्घाटनही अर्धवट स्थितीत असतानाच कलेले. आता तुये हॉस्पिटलचे अर्धवट स्थितीत उद्घाटन करीत असल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.

याच संदर्भात सर्वात प्रथम गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांनी आवाज उठवला होता. आता तुयेचे माजी सरपंच विद्यमान पंच निलेश कांदोळकर, आनंद साळगावकर व माजी सरपंच विलासिनी नाईक यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माजी सरपंच निलेश कांदोळकर यांनी बोलताना इमारत ५२ कोटी रुपये खर्च करून डायलेसिस युनिट उद्घाटन करण्यासाठी ही धावपळ आहे. आम्हाला पूर्ण हॉस्पिटल सोयीसुविधानिशी कार्यरत झालेले हवे.

कोरोना काळात तुये हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा नसल्याने रुग्णांना दूर ठिकाणी उपचार करावे लागले त्याकाळात नवीन हॉस्पिटल कोरोना सेंटर म्हणून सुरु करण्याची नागरिक मागणी करत होते परंतु ती आजपर्यंत मान्य झाली नाही आणि अर्धवट स्थितीत असताना एक युनिट चालू करण्यासाठी सरकारची धडपड चालू असल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. लोकांना सुविधा नाही. साडेचार वर्षात काहीच केले नाही आता निवडणुका जवळ येते म्हणून स्टंट केला जातो असा डावा निलेश कांदोळकर यांनी केला.

पार्सेकर मुख्यमंत्री असताना आपले व्हिजन ठेवून हे हॉस्पिटल उभारले होते. मात्र अजून कोणत्याच सोयी पुरवल्या नाहीत. आता निवडणुकासाठी ही खेळी करू नये , पूर्ण इमारतीत सर्व सोयी चालू करून याचे उद्घाटन करावे अशी मागणी कांदोळकर यांनी केली आहे.

यावेळी माजी सरपंच विलासिनी नाईक आणि पंच आनद साळगावकर आदींनी अगोदर सर्व सुविधा उपलब्ध करा आणि नंतरच हॉस्पिटलचे उद्घाटन करा अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT