World Heart Day: गोव्यात ECG काढायची पहिली मशीन 1950 ला आणली होती

काळजावर हात ठेवून वाचा! चिमुकल्या गोव्यात दर महिन्‍याला सरासरी 150 जणांना ‘अटॅक’
World Heart Day
World Heart DayDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : काळजावर हात ठेवून वाचा! 15 लाखांच्या आसपास ज्या राज्याची लोकसंख्या आहे त्या चिमुकल्या गोव्यात (Goa) दर महिन्याला सरासरी 150 जणांना हृदयविकाराचे (Heart Problem) झटके येतात. विशेष म्‍हणजे त्यातील 20 टक्के रुग्ण पन्नाशीच्या आतील असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळाली.

गोव्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद नाईक यांनी वरील वृत्ताला दुजोरा दिला. ते गोमेकॉत कार्यरत असून, विदेशातही त्यांनी हृदयशस्त्रक्रिया केल्या आहेत. त्‍यांच्या मताप्रमाणे मानसिक ताण, खाण्याच्या बदलत्या सवयी व व्यसनाधीनता ही वाढत्या हृदयरोगाची मुख्य कारणे आहेत. गोव्यात पन्नाशीच्‍या आतील व्यक्तींनाही हृदयविकार जडले असून हे प्रमाण 20 टक्क्यांच्या आसपास आहे.

मडगावातील निष्णात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. फ्रान्सिस कुलासो यांनीही मागच्या 20 वर्षांत गोव्यात हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात हृदयरोगाचे प्रमाण जास्त असून त्याचे मूळ कारण जनुकीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मधुमेह आणि स्थूलपणा ही या रोगाची मुख्य कारणे आहेत. कदाचित भारतीयांचा आहार हेसुद्धा त्याचे मुख्य कारण असावे. जगात झालेल्या संशोधनाप्रमाणे इतर देशांच्या तुलनेत भारतीयांना हृदयविकाराचा झटका पाच वर्षे आधीच येतो असे दिसून आले आहे असेही ते म्‍हणाले. दरम्‍यान, यापूर्वी केरळ राज्यात हृदय रुग्णांचे प्रमाण अधिक असायचे. मात्र मागच्या 10 वर्षांत गोव्याने टक्केवारीत केरळलाही मागे टाकले आहे. या दोन्ही राज्यांत आहारात नारळाचे प्रमाण अधिक असते. ते या मागचे एक कारण असू शकते.

ईसीजी आणि गोवा

डॉ. फ्रान्सिस कुलासो हे मागची 35 वर्षे या व्यवसायात आहेत. त्यांच्या मताप्रमाणे गोव्यात आता हृदय तपासणीची चांगली यंत्रे आहेत. त्यामुळे अशा रोगाचे निदान लवकर होते. पूर्वी अशी यंत्रे नव्हती. त्यावेळी लोक आशा प्रकारे मरण पावल्यास अजीर्ण झाल्याने मृत्यू आला असे म्‍हटले जायचे. गोव्यात ईसीजी काढायची पहिली मशीन 1950 च्यादरम्यान आके-मडगाव येथील डॉ. लुईस पेरेग्रीन द कॉस्ता यांनी आणली, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मडगावात डॉ. गोविंद नायक व डॉ. हरी पै फोंडेकर हे निष्णात हृदयरोगतज्ज्ञ होते. पणजीत डॉ. जी. के. सालेलकर हे या क्षेत्रातील तज्ज्ञ होते असेही स्‍पष्‍ट केले.

मधुमेह आणि स्थूलपणा ही हृदयरोगाची प्रमुख कारणे आहेत. जगात झालेल्या संशोधनाप्रमाणे इतर देशांच्या तुलनेत भारतीयांना हृदयविकाराचा झटका पाच वर्षे आधीच येतो. यापूर्वी केरळमध्‍ये हृदय रुग्णांचे प्रमाण अधिक असायचे. मात्र मागच्या दहा वर्षांत गोव्याने टक्केवारीत केरळलाही मागे टाकले आहे. कदाचित आहार हेसुद्धा त्याचे मुख्य कारण असावे. विशेष म्‍हणजे या दोन्ही राज्यांमध्‍ये आहारात नारळाचे प्रमाण अधिक असते. हेही कारण नाकारता येत नाही.

- डॉ. फ्रान्सिस कुलासो, हृदयरोगतज्ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com