तृणमूल काँग्रेसमध्ये या तीन नेत्यांनाही होती ‘ऑफर’

लुईझिन फालेरो यांच्याबरोबर तृणमूलमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या ॲड. यतिश नायक, विजय पै व आनंद नाईक यांना तर कोणत्याही अटींविना प्रवेश देण्यात येणार आहे.
तृणमूलमध्ये या तीन नेत्यांनाही होती ‘ऑफर’
तृणमूलमध्ये या तीन नेत्यांनाही होती ‘ऑफर’Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, ता. २८ (विशेष प्रतिनिधी) : लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश करण्यासंदर्भात आमदार आलेक्स रेजिनाल्ड, माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस आणि माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काही अटींवर तयारी दर्शविली होती, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी नकार कळविला आहे.

तृणमूलमध्ये या तीन नेत्यांनाही होती ‘ऑफर’
Goa Monsoon Updates: ‘गुलाब’ गेले आता ‘शाहीन’ची चाहूल

दसऱ्यापूर्वी आम्ही कोणत्याही नव्या पक्षात जाणार नाही आणि जायचे असेल, तर आम्हाला त्याआधी विस्तृत चर्चा करावीशी वाटते ,अशी अट या नेत्यांनी ‘आय पॅक’च्या अधिकाऱ्यांशी बोलताना घातली होती. या नेत्यांना आपल्या मतदारसंघात केवळ उमेदवारी नाही, तर पक्षात महत्त्वाचे पद व भरीव निवडणूक निधीची अपेक्षा होती. त्याबद्दल तृणमूल कोणतेही आश्वासन देऊ शकला नाही. लुईझिन फालेरो मात्र केवळ राज्यसभेची उमेदवारी तिही आयपॅकच्या प्रशांत किशोर यांनी दिल्यानंतर तातडीने त्या कळपात सामील झाले, अशी या तिघांची भावना बनली आहे.

तृणमूलमध्ये या तीन नेत्यांनाही होती ‘ऑफर’
World Heart Day: गोव्यात ECG काढायची पहिली मशीन 1950 ला आणली होती

लुईझिन फालेरो यांच्याबरोबर तृणमूलमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या ॲड. यतिश नायक, विजय पै व आनंद नाईक यांना तर कोणत्याही अटींविना प्रवेश देण्यात येणार आहे. वास्तविक फालेरो यांच्याबरोबर या तिघांशिवाय कोणीही प्रवेश घेतलेला नाही. मंगळवारी एकूण दहाजण कोलकात्याला पोचले. त्यापैकी एन. शिवदास, राजेंद्र काकोडकर, लवू मामलेदार, ॲड. कॉस्ता, श्री. पिंटो यांचा समावेश असला तरी त्यांच्याशी ‘आय पॅक’ने स्वतंत्ररित्या संपर्क साधला होता.

तृणमूलमध्ये या तीन नेत्यांनाही होती ‘ऑफर’
Goa Election: संजय राऊत आज गोव्यात, शिवसेना 22 जागा लढवणार

तृणमूलमध्ये जाण्याबाबत ज्या लोकांची चर्चा चालू होती, त्या आग्नेलो फर्नांडिस व सुरेंद्र फुर्तादो यांच्याशी काँग्रेसने आता चर्चा सुरू केली आहे. आग्नेलो यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुलजींनी मला पक्षात महत्त्वाचे पद देण्याचे कबूल केले आहे आणि मी कळंगुटमधून काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहे हेसुद्धा या चर्चेत स्पष्ट झाले, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली. दुसऱ्या बाजूला दिनेश गुंडू राव यांनी सुरेंद्र फुर्तादो यांच्या निवासस्थानी भेट दिली. पणजी मतदारसंघात फुर्तादो यांना उमेदवारी व राज्य कार्यकारिणीत महत्त्वाचे पद देण्याचे आश्वासन यावेळी फुर्तादो यांना देण्यात आले. फुर्तादो यांच्या मते ते लवकरच दिल्लीत राहुल गांधी यांना भेटणार आहेत. राहुल गांधी उद्या शिमल्याला सुट्टीवर जात आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com