Mopa Airport  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : मोपा विमानतळावर पहिल्या विमानाचं 'लॅन्डिंग'

मोपा विमानतळाचं काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच ते प्रवाशांसाठी खुलं केलं जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सोमवारी पहिल्या विमानाच्या लॅन्डिंगची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. एअर इंडिगोचं विमान मोपा विमानतळावर उतरलं आहे. त्यामुळे लवकरच मोपाच्या उद्घाटनाचा मुहूर्त जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मोपा विमानतळाचं काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच ते प्रवाशांसाठी खुलं केलं जाणार आहे.

उत्तर गोव्याला जगाशी जोडणाऱ्या मोपा विमानतळामागील शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. 15 ऑगस्टला उद्घाटन होणारं हे विमानतळ सप्टेंबरमध्ये खुलं केलं जाणार होतं. मात्र आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळ प्रकल्पासाठी ऑक्टोबरची नवी डेडलाईन जाहीर केली आहे. त्यामुळे गोवेकरांना या विमानतळावरुन उड्डाणासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोपा विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणाचे पहिल्या टप्प्यातील काम अजूनही पूर्ण झाले नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नावर उत्तर देताना दिली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या 15 ऑगस्टला ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना मोपा विमानतळाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा वेळोवेळी केली होती. मात्र कोरोना काळात रेंगाळलेले काम प्रगतिपथावर येण्यास उशीर होत असल्याने हे उद्‍घाटन आता लांबणीवर पडणार आहे असे स्पष्ट केले. या विमानतळासाठी लागणारा कर्मचारीवर्ग हा 80 टक्के गोव्यातीलच असेल अशीही त्यांनी घोषणा केली आहे. काही कर्मचाऱ्यांना विमानतळावरील सुरक्षा व इतर कामे हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन तत्पर ठेवण्यात आले आहे.

विमानतळासाठी ज्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या कुटुंबीयांच्या सदस्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी घोषित केले असले तरी स्थानिकांकडून इतर मतदारसंघांतील अधिक उमेदवारांना संधी देण्यात आली असल्याची टीका होत आहे.

मोपावर प्राधान्‍य गोवेकरांनाच
मोपा विमानतळासाठी आवश्‍यक असलेला कर्मचारीवर्गात स्‍थानिकांना प्राधान्‍य दिले जाईल. मात्र प्रशिक्षित आणि उच्चपदस्‍थ जागा भरताना गुणवत्तेचा आधार घ्‍यावा लागत असला तरीसुद्धा प्राधान्‍यक्रम भूमिपुत्रांनाच द्यावा लागेल. त्‍यानंतर ते इतरांचा विचार करू शकतील, असं बोललं जात आहे.

दुसरीकडे गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या प्रती आजही लोकांच्या हृदयात आदराचे स्थान आहे. त्यामुळे बांदोडकरांच्या कार्याचा गौरव हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याकरिता भाऊसाहेबांचे नाव मोपा येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशा आशयाची मागणी भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, पेडणे नामकरण समितीचे संघटक सुभाष केरकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT