first charter flight arrives in Goa today

 

Dainik Gomantak

गोवा

पर्यटनाला नवी उभारी; पहिल्या चार्टर विमानाचे आज गोव्‍यात आगमन

कोविड महामारीच्या फटक्यानंतर राज्याच्या पर्यटन व्यवसायास पूरक ठरेल अशी आशा निर्माण झाली आहे. आज सकाळी पहिल्या चार्टर विमानाचे आगमन दाबोळी विमानतळावर झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Dabolim: कोविड महामारीच्या फटक्यानंतर राज्याच्या पर्यटन (Tourism) व्यवसायास पूरक ठरेल अशी आशा निर्माण झाली आहे. आज बुधवार15 डिसेंबरला सकाळी पहिल्या चार्टर विमानाचे (Charter Plane) आगमन दाबोळी (Dabolim) विमानतळावर झाले आहे. विमानतळ संचालक गगन मलीक यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

‘एअर अस्ताना’ हे चार्टर विमान अलमाटी कझाकिस्तान (Kazakhstan) येथून उद्या गोव्यात दाखल होत आहे. 159 प्रवाशांना घेऊन सकाळी 7 वाजता ते दाबोळी विमानतळावर उतरले. या पहिल्या चार्टर विमानातील प्रवाशांच्या स्वागतासाठी आम्ही एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले, असे मलीक यांनी सांगितले.

गोवा ही राज्य विदेशी पर्यटकांच्या अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. कोरोनामुळे (Covid19) या पर्यटनाला कुठेतरी ब्रेक लागला होता. पण हळूहळू आता पुन्हा एकदा गोवा राज्य पर्यटनाला नव्याने उभारी मिळत आहे. त्याचीच सुरुवात म्हणजे पर्यटन हंगामातील हे पहिले विमान आज गोव्यात दाखल झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT