Goa Assembly 2022 : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (Congress Central Election Committee) आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत काही मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची यादी संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. हल्लीच काही दिवसांपूर्वी पक्षाच्या छाननी समितीची बैठक होऊन उमेदवारांच्या नावाची यादी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवण्यात आली होती, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी दिली.
हल्लीच काँग्रेसच्या (Congress) गेल्या महिन्यात पक्ष गट समित्यांच्या बैठका होऊन त्यांनी पाठविलेल्या नावांची छाननी समितीकडून त्याची छाननी झाली होती. त्यातून अंतिम यादी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली होती. बहुतेक मतदारसंघामध्ये दोन व त्यापेक्षा अधिक उमेदवारांची नावे असल्याने अंतिम निर्णय ही समिती घेणार आहे. पहिल्या यादीत आठ ते दहा मतदारसंघातील नावे जाहीर होतील. काँग्रेसबरोबर गोवा फॉरवर्डची युतीची शक्यता धुसर होत चालली आहे.
गोव्यातील वरिष्ठ निवडणूक (Goa Election) निरीक्षक पी. चिदंबरम यांनी युतीसंदर्भात चर्चा दिल्लीत झाली नाही, तर भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी एकत्र येऊन पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी गोवा फॉरवर्डला मान्यता दिली होती.
त्यामुळे काँग्रेसचे बहुतेक मतदारसंघामध्ये नवे व तरुण उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
भाजप-तृणमूलचे साटेलोटे
काँग्रेसला लक्ष्य बनविण्यासाठी भाजपने तृणमूल काँग्रेसला गोव्यात आणले आहे, हे आता खरे ठरले आहे. चर्चिल तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी चर्चिल ब्रदर्ससाठीचा एक कोटीचा धनादेश देण्याच्या फाईलला मंजुरी दिली आहे. यावरून भाजप-तृणमूल काँग्रेसचे साटेलोटे उघड होत आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.