Shigmotsav in Goa 2023
Shigmotsav in Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav : सत्तरीत वैशिष्ट्यपूर्ण करवल्या उत्सव थाटात

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav सत्तरी तालुक्यात शिमगोत्सवाला होळी घालून उत्साही वातावरणात सुरुवात झाली आहे. नगरगाव, आंबेडे, धावे, उस्ते, बांबर, नानोडा, कोदाळ, ब्रम्हाकरमळी, हेदोडे आदी गावात शिमगोत्सव शेकडो वर्षांपासून साजरा केला आहे.

यात करवल्या हा विशेष आकर्षणाचा केंद्र असतो. वाळपई मासोर्डे, सातोडे आदी गावचा करवल्या उत्सव वैशिष्टयपूर्ण आहे.सत्तरीतील बहुतांश गावांत करवल्या उत्सव सुरू झाला आहे. उद्या शनिवारी सांगता होणार आहे.

विविध गावात चोर हा खेळ खेळण्यात आला. त्यात लहान मुलांना विशेष रूपात पाठीवर पानांचे साधन बांधून, तोंडाला काळा रंग फासून हे चोर प्रत्येकाच्या घरी गेले. सत्तरीत विविध ठिकाणी येथे घरोघरी चोर गेले.

त्यावेळी लोकांनी चोरांची मोठ्या भक्तीभावाने विधीवत पूजा केली. सत्तरीत सात दिवसांच्या या उत्सवात विविध पारंपरिक विधी पार पडणार आहेत. होळीच्या, चोर यांच्या माध्यमातून या उत्सवाला प्रारंभ झालेला आहे.

काही गावचे ग्रामस्थांनी देवाची राय मधून विशिष्ट झाडांची होळी आणून पूजलेली आहे. तर काहीनी जंगलातील आंब्याची नामक झाडाची निवड करून होळी साजरी केली आहे.

Shigmotsav

पारंपरिक नृत्यावर पावले थिरकतात !

सात दिवस रोमटामेळ खेळ खेळले जाणार आहेत. आबालवृद्ध सारेच रोमटामेळ मध्ये सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांचा गजर व बेभान होऊन नाचणे हे या रोमाटचे वैशिष्ट्य आहे. ढोलावर काठी पडली व ताशांचा आवाज कानांत घुमू लागला की प्रत्येकाची पावले या पारंपरिक नृत्यावर थिरकतात.

बऱ्याच गावांमध्ये करवल्या प्रत्येक घरोघरी फिरून त्यांची ओटी भरण्याचा कार्यक्रम होत असतो. देवीच्या नावाने करवल्या आपल्या दारात येणे, हे प्रत्येकासाठी भाग्यदायी असते,अशी मान्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT