Goa Accident: 'तो' चालक होता दारूच्या नशेत! पत्रकार कार्व्हालो मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंद; संशयिताची जामिनावर सुटका

Journalist paul carvalho goa accident: अपघाताच्या वेळी चारचाकी वाहन संशयित अभियंता एकनाथ गावडे चालवत होते. पोलिस तपासात ते दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले.
Journalist paul carvalho goa accident
Journalist paul carvalho goa accidentDainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे: कुडचडे येथील ज्येष्ठ पत्रकार पॉल कार्व्हालो (६०) यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फोंडा येथील पाटबंधारे खात्यात अभियंता म्हणून काम करणाऱ्या एकनाथ गावडे (४३), रा. केरी-फोंडा याला कुडचडे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला केपे येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका केली.

ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. पॉल कार्व्हालो हे आपल्या (जीए ०२,एस ५०१०)या प्लेजर दुचाकीवरून घरी जात असताना त्यांच्या मागील दिशेने वेगात येणाऱ्या टोयोटा (जीए-०५, एफ ३४४९) या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, कार्व्हालो सुमारे दहा मीटर दूर फेकले गेले. अपघातात त्यांचे हेल्मेटही दूर जाऊन पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Journalist paul carvalho goa accident
National Highway Accidents: राष्‍ट्रीय महामार्गांवर दिवसाला किती अपघात घडतात? मंत्री गडकरींनी उघड केली आकडेवारी

जखमी अवस्थेत त्यांना प्रथम कुडचडे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दोन दिवसांनी, शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

Journalist paul carvalho goa accident
Truck Accident: नियंत्रण सुटलं अन् काळानं झडप घातली! हायवेवर ट्रक उलटून 30 प्रवाशांचा मृत्यू; काही क्षणातचं होत्याचं नव्हतं झालं

अपघाताच्या वेळी चारचाकी वाहन संशयित अभियंता एकनाथ गावडे चालवत होते. पोलिस तपासात ते दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी एका अन्य वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण गमावून कार्व्हालो यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी एकनाथ गावडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०५, २८१, १२५(डी) तसेच कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com