Margao Carnival 2026
Margao Carnival 2026Dainik Gomantak

Carnival 2026: खाओ, पिओ, मजे करो! मडगावात कार्निव्हलचा जल्लोष; पहा खास Video

Margao Carnival 2026: किंग मोमो सेड्रिक दा कॉस्ता यांनी ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश दिल्यानंतर रविवारी मडगावात कार्निव्हल जल्लोषात साजरा झाला.
Published on

मडगाव: किंग मोमो सेड्रिक दा कॉस्ता यांनी ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश दिल्यानंतर रविवारी मडगावात कार्निव्हल जल्लोषात साजरा झाला. यावेळी चित्ररथ व कलाकारांच्या नृत्याचा अविष्काराचा हजारो नागरिकांनी जल्लोषी वातावरणाचा सुखद अनुभव घेतला.

पर्यटनमंत्री रोहन खवटे यांच्या हस्ते या कार्निव्हल मिरवणुकीचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी हा गोव्याचा पारंपरिक कार्निव्हल असल्याचे सांगताना आयोजनात आम्ही कुठलीही कसर ठेवली नाही. मिरवणुकीसाठी देशी-विदेशी पर्यटकही येत आहेत, असे सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी या मिरवणुकीत लोक मोठ्या संख्येने उपस्थित असून लोकांत उत्साह असल्याचे सांगताना, आनंद लुटा असे सांगितले. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी हा पारंपरिक कार्निव्हल असून त्या निमित्त ‘खावो, पिवो, मजा करो’ असे आवाहन केले.

Margao Carnival 2026
Fatorda Mini Carnival: मडगांवा जालो 'मिनी कार्निव्हल' Watch Video

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी सर्वांना कार्निव्हलच्या शुभेच्छा दिल्या. मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनीही कार्निव्हलचा सर्वांनी आनंद लुटावा असे सांगितले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही मिरवणुकीत सहभागी झाले.

Margao Carnival 2026
Goa Carnival 2026: उत्सुकता संपली! गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; संपूर्ण शेड्युल जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

चित्ररथ पाहण्यास गर्दी

हॉली स्पिरिट चर्च पासून या कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ झाला व पालिका चौकात सांगता झाली. मिरवणुकीत गोव्याची गौरवशाली व वैभवशाली परंपरेचे दर्शन घडविणारे चित्ररथ होते. यात पर्यावरणाचा संदेश देणारे, तसेच गोव्यातील पारंपारिक व्यवसायावर आधारित पोदेर, खाजेकर, चणेकार, मासे विक्रेते व अन्य चित्ररथांचाही समावेश होता. मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com