Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: बस्तोडा येथे घरात आढळून आला महिलेचा कुजलेला मृतदेह

परिसरात दुर्गंधी; पोलिसांनी दरवाजा तोडून केला घरात प्रवेश

Akshay Nirmale

Mapusa Crime News: गोवा विस्तावाडो, बस्तोडा येथे एका वृद्धेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. सुकांती उर्फ श्रीमती शशिकांत कुडणेकर (75) असे मयतीचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. 5) सायंकाळी उशिरा उडघकीस आली.

मृत वृद्धा ही घरी एकटीच राहत होती, तर तिच्या घराशेजारी तिची विवाहित मुलगी आणि जावई राहत होते. मात्र शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे मुलीसोबत चांगले संबंध नव्हते. दरम्यान, सुकांती कुडणेकर यांना आरोग्याच्या विविध समस्या होत्या.

गेले काही दिवस त्यांचा कुणाशीही संपर्क झालेला नव्हता. रविवारी सायंकाळी या वृद्धेच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी येऊन घराचा दरवाजा उघडला असता सुकांती यांचा मृतदेह संपूर्ण कुजलेल्या स्थितीत आढळून आला.

महिला पोलीस उपनिरीक्षक रिचा भोंसुले व हवालदार सुशांत चोपडेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनसाठी गोमेकॉत पाठविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GOA vs UP: गोव्याचा युवा महिला संघ पुन्हा पराभूत, हर्षिताचे अर्धशतक व्यर्थ; उत्तर प्रदेश पाच विकेटने विजयी

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

SCROLL FOR NEXT