CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटकांची सतावणूक करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही

Goa Tourism: मुख्यमंत्र्यांचा इशारा: पर्रा येथे ‘फेस्टिवल आॉफ लाईट्स’

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोवा आणि गोव्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद आणि आनंद घेण्यासाठी राज्याला भेट देणारा कुठलाही पर्यटक मग तो देशी असो किंवा विदेशी डोळ्यांत अश्रू आणून येथून परतता कामा नये. त्यासाठी यापुढे कडक उपाययोजना आखण्यात येणार असून या कामाची सुरवात गुरुवारी रात्री कळंगुटमध्ये सील करण्यात आलेल्या वादग्रस्त 11 ‘डान्स बार’वरील कारवाईपासून सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रा येथे सांगितले.

पर्रा सिटीझन्स फोरमतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘फेस्टिवल आॉफ लाईट्स’ या सांस्कृतिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

सामाजिक एकात्मतेचा आपला वारसा जपून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आमदार मायकल लोबो यांचेही समयोचित भाषण झाले. आमदार दिलायला लोबो यांनी आभार मानले.

2 हजार स्पर्धकांचा सहभाग

पर्रा सिटीझन्स फोरमतर्फे आयोजित ९ व्या राज्यव्यापी ‘फेस्टिवल आॉफ लाईट्स’ या स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी गोव्याच्या विविध भागातून आलेल्या एकूण 17 चर्च ग्रुपनी नाताळगीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

जीवबा दळवी यांचा सत्कार

यावेळी म्हापशाचे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी तसेच अन्य पोलिस अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री डॉ. ‌प्रमोद सावंत यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT