Goa Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: शिगमोत्सवावरून म्हापशातील वातावरण तापले

मिरवणूक रविवारीच हवी : स्थानिकांनी घेतल्या नेत्यांच्या गाठीभेटी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav 2023: म्हापशातील शिगमोत्सव रविवारी साजरा करण्याची मागील 40 वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा पर्यटन खात्याने रविवारऐेवजी म्हापसा शहराला सोमवारी शिगमोत्सव मिरवणुकीसाठी दिवस दिला आहे. या प्रकारामुळे म्हापशातील स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडे आपला शिगमोत्सव रविवारीच व्हावा, यासाठी जोरदार मागणी केली आहे.

म्हापशाचा शिगमोत्सव हा पूर्वीप्रमाणे रविवारीच साजरा करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लक्ष घालावे व म्हापसावासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करीत शिगमोत्सव समितीच्या सदस्यांनी व जागरूक नागरिकांनी शनिवारी (ता.4) पणजी येथील भाजप मुख्यालयात तानावडे यांची भेट घेतली.

यावेळी शिगमोत्सव समितीचे सदस्य व माजी नगरसेवक तुषार टोपले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक तथा पत्रकार नारायण राटवड, समाजसेवक संजय बर्डे, राजू तेली, सितेश मोरे आदींनी आज तानावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

सोमवारी सातेरीचा गुलालोत्सव

मागच्या 40 वर्षांपासून म्हापसा शिगमोत्सवाची सुरुवात ही देवी शांतादुर्गा व देव राष्ट्रोळीला नमन केल्यानंतर चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्याने होते. यंदा सोमवार, दि. 13 रोजी ग्रामदेवी श्री सातेरी देवीचा गुलालोत्सव आहे.

या धार्मिक कार्याची दखल घेऊन सरकारने सोमवारचा शिगमोत्सव रद्द करावा व पुन्हा रविवारी साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मध्यस्थी करण्यास सांगावे, असा आग्रह म्हापसावासीयांनी धरला आहे.

स्मार्ट सिटीच्या कामांचा व्यत्यय नाही : धेंपो

यंदा शिगमोत्सवातील पहिली मिरवणूक 11 मार्च रोजी 18 जून रस्तामार्गेच निघणार असून स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या कामांचा व्यत्यय येणार नसल्याचे प्रतिपादन शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संदीप नाईक म्हणाले, पर्यटन खाते, वाहतूक पोलिस, प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी सक्तीने बजावले आहे की, रात्री 10 पूर्वी मिरवणूक संपणे गरजेचे आहे. अन्यथा, साऊंड सिस्टिम बंद केली जाईल. त्यामुळे दहापूर्वी मिरवणूक आटोपती घ्यावी यासाठी उद्या महापालिकेत रोमटामेळ, लोकनृत्य आणि चित्ररथ प्रतिनिधींची बैठक बोलाविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Racing Festival: ‘गोवा स्ट्रीट रेस’ वरून नवा वाद! सरकारी कराराचे उल्लंघन होत असल्याचा दावा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

SCROLL FOR NEXT