Cm Pramod Sawant: येत्या वर्षभरात गोव्यात सुसज्ज हज भवन उभारणार

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन: मडगाव जिल्हाधिकारी संकुलात हज समितीसाठी कार्यालय
Cm Pramod Sawant
Cm Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

हज यात्रेकरूंच्या सोईसाठी येत्या वर्षअखेर गोव्यात सुसज्ज असे हज भवन उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हज समितीच्या बैठकीत दिल्याची माहिती गोवा हज समितीचे अध्यक्ष ऊर्फान मुल्ला यांनी दिली.

मुख्यमंत्री सावंत यांच्या पणजी येथील शासकीय बंगल्यावर या नवीन समितीची पहिली बैठक झाली. मुख्यमंत्री स्वतः या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हज समितीसाठी मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात सुसज्ज असे कार्यालय देण्या बरोबरच अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सर्व योजनांची कार्यवाही या कार्यालयातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हज यात्रेला गोव्यातून 200 यात्री जात असेल तर गोवा ते सौदी अरेबिया असे थेट विमान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय अल्पसंख्यांक विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी गोवा मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

तसेच हज यात्रेसाठी अर्थसंकल्पात 30 लाखांची तरतूद केली आहे ती 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यानी दिले असल्याची माहिती मुल्ला यांनी दिली. मुल्ला यांची हज समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Olympians Development
Goa Seventh Budget 30000 Crore
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com