Goa Crime Canva
गोवा

Goa Drugs News: गोव्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश! कोटींचा मुद्देमाल जप्त; पुस्तके, फोटो फ्रेमद्वारे ड्रग्स तस्करी

गोमन्तक डिजिटल टीम

Smuggler Arrestetd In Anjuna By Anti Narcotics Cell of Police Department

पणजी: अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने गोव्यासह इतर राज्यांमध्ये ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्या एका बिगर गोमंतकीयाच्या मुसक्या हणजूण येथून तो राहात असलेल्या फ्लॅटमध्ये आवळल्या. विशेष म्हणजे, हा माफिया ड्रग्स तस्करीसाठी पुस्तके आणि फोटो फ्रेमचा वापर करायचा.

पोलिसांनी सुमारे १,८२५ एलएसडी ब्लॉट पेपर्स तसेच इतर ड्रग्स मिळून सुमारे १ कोटी १० लाखांचा अमली पदार्थ जप्त केला. त्याला अटक केल्याने आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटमध्ये गुंतलेल्या इतरांचा शोध सुरू असून त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गस्त वाढविली; कसून तपासणी

काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी सुमारे साडेपाच हजार कोटींचे कोकेन जप्त करून ड्रग्स माफियांना गजाआड केले होते. या ड्रग्सची तस्करी गोव्यातून दिल्लीसह विविध राज्यांमध्ये झाली होती. त्यामुळे गोव्यातील अमली पदार्थविरोधी पथक तेव्हापासून अधिक सतर्क झाले आहे.

पर्यटन हंगाम सुरू झाल्याने गोव्यात येत्या डिसेंबरपर्यंत गोव्यात ड्रग्सची मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस दल दक्ष झाले आहे. विमानतळ, रेल्वे, बस स्थानकांसह चेकनाक्यांवर कडक तपासणी केली जात आहे.

पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा आणि उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सजीत पिल्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक दीनदयाळ रेडकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

स्थानिकांचाही सहभाग

गेल्या १२ दिवसांत ड्रग्सविरोधी पथकाने ही पाचवी कारवाई केली आहे. स्थानिकांसह विदेशी तसेच परप्रांतीय या ड्रग्स व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतले आहेत. पर्यटन हंगाम जवळ येत असल्याने पोलिसांनी ही कारवाई अधिक कठोर केली आहे. रात्रीच्या गस्ती वाढविल्या असून संशयास्पद फिरणारे परप्रांतीय तसेच विदेशी नागरिकांचीही तपासणी केली जात आहे.

...असा केला पर्दाफाश

१. ड्रग्स माफियाला पुस्तके आणि फोटो फ्रेममधून ड्रग्ससाठा येत होता. तो परदेशात मागणीनुसार तस्करी करत होता.

२. तो गोव्यात अनेक वर्षांपासून राहात असून तो ‘डार्कनेट’च्या माध्यमातून हे ड्रग्स मिळवत होता.

३. त्याचा अधिकतर वापर गोव्यात तसेच गोव्याबाहेरील शहरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत पार्ट्यांमध्ये केला जायचा.

४. त्याची माहिती मिळाल्यानंतर गेला महिनाभर त्याच्यावर नजर ठेवली होती. काल रात्री तो हणजूण येथील फ्लॅटवर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

५. यावेळी त्याच्या फ्लॅटवरील काही पुस्तकांमध्ये तसेच फोटो फ्रेम्समध्ये एलएसडी ब्लॉल पेपर्स लपवून ठेवले होते, ते जप्त केले.

६. हे ड्रग्स तरुणांकडून अधिक पसंत केले जात असल्याने संगीत पार्ट्यांमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.

७.या ड्रग्स माफियाचे देशात तसेच परदेशातील माफियांशी संबंध असल्याने त्याचा तपास करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: अमित पाटकर यांच्याकडून TCP मंत्री आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल!!

Goa Diary: एकेकाळी फेणीसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आज बनलंय पर्यटकांचं केंद्र, कोरोनानंतर हा बदल कसा घडला?

गोव्यातील रस्ता सुरक्षा सप्ताह! 'उपक्रम' की जबाबदारी 'लोकांवर' ढकलण्याचा उद्योग

Calangute Beach: यापुढे 'डान्सबारना' थारा नाही; शांतता राखण्यासाठी 'कळंगुट'वासीयांची एकजूट

Goa History: गावड्यांच्या शुद्धीकरणाचे सत्य आणि आदिम सांस्कृतिक जीवनशैली

SCROLL FOR NEXT