Assonora
Drugs Seized
Assonora Drugs SeizedDainik Gomantak

Assonora Crime: गोव्यात अंमलीपदार्थविरोधी पथकाचा धडाका! अस्नोड्यात तिघांच्या मुसक्या आवळल्या; आठवड्यातील चौथी कारवाई

Assonora Crime News: १३ किलो गांजाच्या तस्करीप्रकरणी या कक्षाच्या पोलिस पथकाने एका स्थानिक अट्टल ड्रग्ज गुन्हेगारासह तिघाजणाना अस्नोडा येथे अटक केली.
Published on

पणजी: गेल्या काही दिवसांपासून अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने ड्रग्ज माफिया व विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. १३ किलो गांजाच्या तस्करीप्रकरणी या कक्षाच्या पोलिस पथकाने एका स्थानिक अट्टल ड्रग्ज गुन्हेगारासह तिघाजणाना अस्नोडा येथे अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांची नावे मेर्विन फर्नांडिस (आसगाव) व शशिकांत कुमार गुप्ता व गुड्डू कुमार भुईया (झारखंड) अशी आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरातील या कक्षाने केलेली ही चौथी कारवाई आहे.

Assonora
Drugs Seized
Goa Drugs Case: रेल्वेतून गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा गोव्यात पर्दाफाश! ओडिशा रॅकेटमधील तिसऱ्या संशयिताला अटक

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीवेळी संशयित मेर्विन फर्नांडिस याला यापूर्वीही ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे. त्याला २०१८ मध्ये हिमाचल प्रदेशमधील पोलिसांनी पहिल्यांदा चरसप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयाने जामीन दिला होता. यावर्षी एनसीबीने त्याला व त्याच्या वडिलांना अटक केली होती. एनसीबीने त्यांच्या आसगाव येथील घरावर छापा टाकला होता व त्यांच्याकडून चरस व कोकेन जप्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com