Babush Monserrate |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: 'तो' खटला महिला न्यायाधीशांच्या न्यायालयात चालणार?

अभियोग पक्षाची मागणी : युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Babush Monserrate: सावंत सरकारातील वादग्रस्त मंत्री बाबूश मोंसेरात यांच्यावर दाखल करण्यात आलेला बलात्कार प्रकरणातील खटला महिला न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग करण्यात यावा अशी मागणी सरकारी वकील व्ही. जे. कॉस्टा यांनी आज केली.

2016 साली हे कथीत लैंगिक अत्याचार प्रकरण घडले होते. एका अल्पवयीन मुलीने मोंसेरात यांनी आपल्याला 50 लाख रुपये देऊन विकत घेऊन नंतर आपल्याला गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

राजकारण्यांच्या विरोधात दाखल केलेले खटले हाताळण्यासाठी खास न्यायाधीश म्हणून दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांची नियुक्ती केल्याने हा खटला त्यांच्या समोर सुनावणीस आला होता.

सरकारी वकील कोस्टा यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार बलात्काराची प्रकरणे फक्त महिला न्यायधिश हाताळू शकतात. त्यामुळे हा खटला महिला न्यायाधिशांच्या न्यायालयात वर्ग करावा अशी मागणी केली. या अर्जावर आता 31 मार्च रोजी निवाडा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT