ISL Final: उद्या मेगा फायनल! आयएसएल करंडकासाठी फातोर्ड्यात बंगळूर एफसी, एटीके मोहन बागान भिडणार

फातोर्ड्यातील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडिमयवर रंगणार थरार
आयएसएल करंडकासमवेत एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हुआन फेर्रांडो व बंगळूर एफसीचे प्रशिक्षक सायमन ग्रेसन.
आयएसएल करंडकासमवेत एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हुआन फेर्रांडो व बंगळूर एफसीचे प्रशिक्षक सायमन ग्रेसन.Dainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League Football Final: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील करंडक विजेतेपदासाठी शनिवारी (ता. 18) बंगळूर एफसीसमोर कोलकात्याच्या एटीके मोहन बागान संघाचे आव्हान असेल. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अंतिम सामना खेळला जाईल.

आयएसएल स्पर्धेत करंडकासाठी पाचव्यांदा गोव्यात निर्णायक सामना होत आहे. बंगळूरने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली असून ते दुसऱ्यांदा करंडक जिंकण्यास प्रयत्नशील असतील. एटीके मोहन बागानने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आयएसएल करंडकासमवेत एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हुआन फेर्रांडो व बंगळूर एफसीचे प्रशिक्षक सायमन ग्रेसन.
IND vs AUS 1st ODI: जड्डू, गिल, केएलचे शानदार कॅच, तर शमी, सिराज गोलंदाजीत चमकले; पाहा Video

सायमन ग्रेसन यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरने मोसमाच्या सुरवातीस ड्युरँड कप पटकावला होता. त्यानंतर आयएसएल स्पर्धेच्या साखळी फेरीत खराब सुरवातीनंतर ओळीने 10 सामने जिंकत त्यांनी मुसंडी मारली.

स्पर्धेच्या साखळी फेरीत दोन्ही संघांनी प्रत्येकी 34 गुण नोंदविले. तिसऱ्या क्रमांकावरील हुआन फेर्रांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानने प्ले ऑफ नॉकआऊट लढतीत ओडिशाला 2-0 असे हरविले, नंतर उपांत्य फेरीतील दोन्ही टप्प्यात गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटवर गोलरक्षक विशाल कैथच्या शानदार कामगिरीच्या बळावर हैदराबादला 4-3 असे हरविले.

साखळी फेरीतील चौथ्या क्रमांकनंतर बंगळूरने प्ले ऑफ नॉकआऊट लढतीत केरळा ब्लास्टर्सला 1-0 फरकाने नमविले. नंतर लीग शिल्ड विजेत्या मुंबई सिटीला उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यात 1-0 असे नमवून सलग दहावा विजय नोंदविला.

आयएसएल करंडकासमवेत एटीके मोहन बागानचे प्रशिक्षक हुआन फेर्रांडो व बंगळूर एफसीचे प्रशिक्षक सायमन ग्रेसन.
Former Australia Captain: ऑस्ट्रेलियाच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूने घेतला मोठा निर्णय, निवृत्तीची केली घोषणा!

परतीच्या लढतीत बंगळूर येथे मुंबई सिटीने 2-1 असा विजय मिळविता, त्यामुळे दोन्ही संघांत 2-2 अशी गोलबरोबरी झाली. पेनल्टी शूटआऊटवर गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूच्या अफलातून कामगिरीमुळे बंगळूरने 9-8 गोलफरकाने बाजी मारली.

सुनील छेत्री बंगळूरसाठी सुपर सब

अनुभवी भारतीय आघाडीपटू 38 वर्षीय सुनील छेत्री याला बंगळूरचे प्रशिक्षक ग्रेसन यांनी कल्पकपणे वापर केला आहे. गेल्या काही सामन्यात बदली खेळाडू (सुपर सब) या नात्याने छाप पाडताना छेत्रीने तीन वेळा निर्णायक गोल केला.

बाद फेरीत केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्याचा थेट फ्रीकिक गोल निर्णायक ठरला होता. एटीके मोहन बागानविरुद्धही छेत्री सुपर सब राहण्याचे संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com